two minors boys Forced to drink urine tortured with chilies up crime news video goes viral  esakal
देश

Crime News : संतापजनक! अल्पवयीन मुलांना बळजबरीने लघवी प्यायला लावली; शारीरिक इजेसाठी केला मिरचीचा वापर

रोहित कणसे

दोन अल्पवयीन मुलांसोबत अत्यंत संतापजनक आणि अमानुष प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यात दोन अल्पवयीन मुलाना बळजबरीने लघवी पिण्यास भाग पाडल्यासोबतच हिरव्या मिरच्या वापरून गंभीर शारिरीक इजा केल्याचा प्रका

र घडाला आहे. या दोन पीडित मुलांवर चोरी केल्याचा आरोप करत जबरदस्तीने कसले तरी इंजेक्शन देखील देण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेत अत्याचार झालेल्या पीडितांचे वय अवघे 10 आणि 15 वर्ष इतके आहे.

या भयंकर कृत्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये मुलांना हिरव्या मिरच्या खाण्यासोबत बाटलीत भरलेली लघवीत पिण्यास भाग पाडले जात असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडीओत काही लोक या दोन अल्पवयीन पीडितांना शिवीगाळ करत तसे न केल्यास मारहाण करण्याची धमकी देताना देखील ऐकू येत आहेत. या मुलांचा पैसे चोरल्याचा आरोप करत त्यांना पकडून बांधून ठेवलं आणि त्यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आले.

आणखी एका व्हिडिओमध्ये ही मुले जमिनीवर तोंड करून हात पाठीमागे बांधलेल्या आणि पँट खाली ओढलेले आवस्थेत दिसत आहेत. हिरव्या मिरच्या वापरून केलेल्या छळाने ही मुले वेदनेने ओरडत असताना या मुलांना पिवळ्या रंगाचे कुठलेतरी द्रव इंजेक्शनच्या माध्यमातून टोचण्यात आल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा धक्कादायक व्हिडीओ 4 ऑगस्ट रोजी शूट केलेला आहे. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशमधील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील पाथरा बाजार पोलीस स्टेशन हद्दीतील

सोशल मीडियावर फिरत असलेल्या या व्हिडिओची पोलिसांकडून त्वरित दखल घेण्यात आली आहे. तसेच कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पोलिसांनी या घटनेत सहभागी असलेल्या लोकांची ओळख पटवली असून त्यापैकी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सिद्धार्थ यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Scam: ‘वॉटर बिल अपडेट करा अन्यथा पाणी बंद’ अशा धमकीने; उद्योजकाला ५४ लाखांचा गंडा

CM Devendra Fadnavis: रस्ता रुंदीकरणाला पाठिंबा; मुख्यमंत्री फडणवीस; गरज असेल तिथे भूसंपादन

Illegal Sand Mining: सुखना नदीतून वाळू उपसा करणारे जेरबंद; पाचजणांवर गुन्हा; पाच ट्रॅक्टरसह तीस लाखांचा मुद्देमाल जप्त

Manmad News : इंदूर-पुणे महामार्गावर कंटेनर अपघात; मनमाडजवळ वाहतुकीचा खोळंबा, प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Updates : पालकमंत्री अतुल सावे यांची गाडी गावकऱ्यांनी अडवली

SCROLL FOR NEXT