Afganistan 
देश

अफगाणिस्तानातून भारतात परतलेल्या १४६ पैकी दोन जण कोरोना पॉझिटिव्ह

दोघांचीही आयसोलेशनमध्ये रवानगी

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : अफगाणिस्तानातून आज भारतात परतलेल्या १४६ लोकांपैकी दोघे जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. दिल्ली सरकारमधील नोडल ऑफिसर राजिंदर कुमार यांनी ही माहिती दिली. अफगाणिस्तानातून दिल्ली विमानतळावर परतलेल्यांची कोरोना चाचण्या करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

परदेशातून भारतात दाखल होणाऱ्या व्यक्तींसाठी सध्या जी कोविड नियमावली लागू आहे त्यानुसार कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या त्या दोघांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. यानंतर १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर आणि चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज दिला जाईल. या पॉझिटिव्ह रुग्णांची ओळख अद्याप समोर आलेली नाही.

अफगाणिस्तानातून कतारची राजधानी दोहा मार्गे आज १४६ भारतीयांना बाहेर काढण्यात आलं. त्याचं सोमवारी सकाळी राजधानी दिल्लीत आगमन झालं.

काबूल विमानतळावरुन दररोज दोन विमानोड्डाणांना परवानगी

अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी काबूल विमानतळावरुन दररोज दोन विमानोड्डानं करण्यास नाटोनं भारताला परवानगी दिली आहे. गेल्या आठवड्यात इथल्या परिस्थितीचा आढावा घेताना पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन केलं होतं. यामध्ये अफगाणिस्तानातील युद्धजन्य भागातून भारतीयांना प्राधान्यानं बाहेर काढण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुरुंगातून सुटल्यानंतर संतोष पंडित यांचा पहिला व्हिडीओ, रस्त्यात खड्ड्याला घातला हार; पाहा video

IND vs JPN: ३२ धावा करूनही भारताने जपानला हरवलं! २ धावांच्या थरारक विजयासह टीम इंडियाने रचला असा वर्ल्ड रेकॉर्ड, जो आजपर्यंत कुणालाच जमला नाही

PPF की NPS? दरमहा 5000 रुपयांच्या गुंतवणुकीतून उभे राहतील दीड कोटी रुपये; जाणून घ्या संपूर्ण गणित

Marathi News Live Updates: पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

SCROLL FOR NEXT