देश

त्या दोन रुग्णांचा मृत्यू स्वाईन फ्ल्यूमुळे नाहीच...

तेजश्री कुंभार

पणजी : काही दिवसांपूर्वीच मडगावमध्ये आणि गोवा वैद्यकीय महाविद्यालय, बाबोळी येथे दोन रुग्ण दगावले. हे दोन्ही रुग्ण स्वाईन फ्ल्यूमुळे नाही तर हृदयाच्या गंभीर आजारामुळे दगावले असल्याची माहिती आरोग्य संचालनालयातील साथीरोगतज्ञ डॉ.उत्कर्ष बेतोडकर यांनी दिली. या दोन्ही रुग्णांना स्वाईन फ्ल्यूचे निदान झाल्याचे सत्य असले तरी त्यांच्या मृत्यूचे कारण त्यांना असणारा हृदयाचा गंभीर असल्याचा खुलासाही यावेळी डॉ.बेतोडकरांनी केला. 

असे असले तरी यावर्षी आजवर सुमारे सात रुग्णांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाली असल्याची नोंद आमच्याकडे आहे. यातील दोघांचा मृत्यू झाला असून सध्या ही संख्या पाच आहे. स्वाईन फ्ल्यू हा रोग संसर्गजन्य असल्याने प्रत्येकाने स्वतःची काळजी घेतली पाहिजे, असेही डॉ.बेतोडकर म्हणाले. 
मागीलवर्षीपेक्षा यावर्षी हे प्रमाण कमी असल्याचे लक्षात येते. मागीलवर्षी 2017 साली राज्यभरात एकूण दोनशे साठ रुग्णांना स्वाईन फ्ल्यूचे निदान झाले होते तर यातील बारा जणांचा मृत्यू झाला होता. त्यामागीलवर्षी म्हणजेच 2016 साली एकूण एकशे त्र्याण्णव जणांना निदान झाले होते तर एकोणीस जणांचा मृत्यू झाला होता. यावर्षी हा आकडा कमी अद्यापतरी कमी असून जास्तीत काळजी घेऊन आपण या आजाराला नागरिकांना लागण होण्यापासून वाचवू शकतो, असेही डॉ.बेतोडकर म्हणाले. 

आरोग्य संचालनालय स्वाईन फ्ल्यूचा प्रसार रोखण्यासाठी वर्षभर विविध माध्यमातून कार्यरत असते. शाळा, महाविद्यालये, पंचायती यासह विविध संस्थांमध्ये व्याख्याने आणि आरोग्यविषयक शिबिरांच्या माध्यमातून आरोग्य संचालनालय कार्यरत असते. या घडीलाही राज्यातील सरकारी तसेच खासगी इस्पितळांना आणि औषधालयांना फ्ल्यूबाबतची सर्व औषधे उपलब्ध करण्याच्या सूचना आम्ही दिल्या आहेत. जेथे स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण सापडले आहेत, त्या भागातील सरकारी इस्पितळाच्या संपर्कात आम्ही सतत आहोत. सध्या या आजाराचे रुग्ण कमी आहेत पण भविष्यात तो अधिक बळावला तर आम्ही लोकांची काळजी घेण्यासाठी सर्व तयारी करून ठेवली असल्याचेही डॉ. बेतोडकरांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत आंदोलन करणं CJPला महागात पडलं! अभिजीत दिपकेंसह सर्व आंदोलकांवर गुन्हा दाखल, पोलिसांची कडक कारवाई

Sarva Pitri Amavasya 2026: यंदा सर्वपित्री अमावस्या कधी आहे? जाणून घ्या शुभ तिथी, तर्पण मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

हल्लेखोर को-पायलटचं नाव समोर, ओमानमध्ये घातलेली बंदी; कट्टरपंथी विचारसरणीचा असल्याचंही उघड

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

Gold Silver Prices : पितृपक्षामुळे सोने-चांदीची 'झळाळी' पडली फिकी; ग्राहकांची खरेदीकडे पाठ, आता विजयादशमीची आशा, जाणून घ्या दर

SCROLL FOR NEXT