two political leaders of sdpi and bjp party were killed in alappuzha within hours 
देश

केरळ : भाजप नेत्यासह दोघांची १२ तासात हत्या; परिसरात कलम १४४ लागू

सकाळ डिजिटल टीम

केरळमधील अल्झुप्पा (Alappuzha) येथे 12 तासांच्या आत दोन नेत्यांची हत्या झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) आणि भारतीय जनता पार्टी (BJP) या पक्षांच्या दोन राज्यस्तरीय नेत्यांना ठार मारण्यात आले आहे. या हत्येनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून, परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे.

रविवारी सकाळी भाजपच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव रणजित श्रीनिवासन यांची त्यांच्या घरासमोर हत्या करण्यात आल्याने परिसरात घबराटीचे वातावरण आहे. पोलिसांनी सांगितले की, भाजप नेता मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले असताना आठ जणांच्या टोळीने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करत चाकूने वार केले. दरम्यान रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

तर एसडीपीआयचे राज्य सचिव शान केएस (३८) यांची शनिवारी रात्री अज्ञात टोळक्याने वार करून हत्या केली. एसडीपीआय नेत्यावर स्कुटरवरून मन्नाचेरी येथे घरी परतत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. पोलिसांनी सांगितले की, कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी प्रथम त्याच्या दुचाकीला धडक दिली आणि खाली पडल्यानंतर त्यांच्यावर अनेक वेळा वार करण्यात आले. या हल्ल्यात त्यांना अनेक फ्रॅक्चर आणि डोक्याला दुखापत झाली आणि नंतर एर्नाकुलममधील एका खाजगी रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी अलाप्पुझा येथील दोन राजकीय हत्यांचा निषेध केला आहे आणि सरकार कोणालाही कायदा हातात घेऊ देणार नाही असे सांगितले. अशा गुन्हेगारांवर कडक कारवाई केली जाईल असे देखील सांगीतले. दरम्यान भाजप आणि एसडीपीआयने एकमेकांवर या हत्येला जबाबदार असल्याचा आरोप केला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missing Link Accident: बोरघाटात थरार! मिसिंग लिंक मार्गावर अनेक भरधाव वाहनांची एकमेकांना धडक; काही गाड्यांचा चक्काचूर

घरातील तांदळात विषारी रासायनिक पदार्थाची भेसळ, दोन वर्षीय चिमुकलीची प्रकृती गंभीर; १५ तासांत हृदय तीन वेळा बंद

Latest Marathi News Live Update : खासदार संजय देशमुखांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त

Mahila Bachat Gat: अडीच एकर जमीन अन् १ लाखाचे अनुदान, फडणवीस सरकारची मोठी भेट

Scooter Airbag : आता कारप्रमाणे स्कूटर्समध्येही असतील एअरबॅग; अपघातात वाचवणार तुमचा जीव, पाहा कोणत्या कंपनीने आणली सुविधा

SCROLL FOR NEXT