Jammu and Kashmir News esakal
देश

उरीसारखा प्लान फसला! परगल छावणीत घुसणारे दोन दहशतवादी ठार; 3 जवान शहीद

सकाळ डिजिटल टीम

Terrorists Killed in Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये भारतीय लष्कराच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या चकमकीत भारतीय लष्कराचे तीन जवान शहीद झाले आहेत. दहशतवादी राजौरी येथील लष्कराच्या छावणीत घुसण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळी दोन्ही बाजूंनी करण्यात आलेल्या गोळीबारात लष्कराच्या जवानांना दोन दहशवाद्यांना ठार करण्यात यश आले. तर, यामध्ये भारतीय लष्कराचे तीन जवान शहीद झाले आहेत. राजौरी येथील लष्कराच्या छावणीत दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उरी हल्ल्याची आठवण करून देणारा आहे.

सध्या या ठिकाणी लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे परगल येथील लष्करी छावणीत किती दहशतवादी घुसण्याचा प्रयत्न करत होते याबाबत कोणतीही माहिती अद्यापपर्यंत समोर आलेली नसून, या चकमकीत भारतीय लष्कराचे दोन जवान जखमी झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता या कारवाईदरम्यान, भारतीय लष्कराचे तीन जवान शहीद झाले आहेत.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, राजौरीतील दारहाल भागातील परगलमध्ये लष्कराच्या छावणीचे कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न कोणीतरी केला. यावेळी दोन्ही बाजूंनी गोळीबार करण्यात आला ज्यामध्ये दोन दहशतवादी मारले गेले. तर, लष्कराचे तीन जवान शहीद झाले आहेत.

एडीजीपी मुकेश सिंह यांनी सांगितले की, दारहाल पोलिस स्टेशनपासून 6 किमी अंतरापर्यंत अतिरिक्त पथके पाठवण्यात आली आहेत. यात 2 दहशतवादी ठार झाले असून तीन लष्करी जवान शहीद झाले आहेत. परिसरात सर्च ऑपरेशन सुरू असून आहे. स्वातंत्र्य दिनापूर्वी देशाला हादरवून सोडण्यासाठी कोणतीही मोठी घटना घडवून आणण्याचा प्रयत्न दहशतवादी संघटना सातत्याने करत असतात. गुप्तचर यंत्रणा सतर्क आहेत आणि भारतीय सुरक्षा दले दहशतवाद्यांच्या नापाक मनसुब्यांना ठामपणे हाणून पाडत आहेत.

परगलमधील हल्ल्याने उरीची आठवण

राजौरी येथे आज करण्यात आलेल्या या घटनेनंतर उरीतील दहशतवादी हल्ल्याची आठवण झाली. 18 सप्टेंबर 2016 रोजी जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ भारतीय लष्कराच्या स्थानिक मुख्यालयात घुसून दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर हल्ला केला होता. यात दहशतवाद्यांनी झोपलेल्या जवानांवर गोळीबार करत 17 हँडग्रेनेडचा वापर केला होता. यामध्ये लष्कराचे 16 जवान शहीद झाले होते. सुमारे सहा तास चाललेल्या या चकमकीत भारतीय लष्कराने चारही दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. 20 वर्षांतील भारतीय लष्करावरील हा सर्वात मोठा हल्ला होता. दहा दिवसांनंतर, 28-29 सप्टेंबरच्या मध्यरात्री भारतीय लष्कराने संपूर्ण नियोजनासह पीओकेमध्ये तीन किलोमीटर आत घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT