pulwama
pulwama 
देश

मोठी बातमी : पुलवामात दोन दहशतवादी ठार; सर्च ऑपरेशन सुरु

सकाळवृत्तसेवा

जम्मू आणि काश्मीर : पुलवामामध्ये एन्काऊंटर ऑपरेशन सुरु आहे. पोलिस आणि सुरक्षा दलांच्या संयुक्त विद्यमाने हे ऑपरेशन सुरु आहे. यामध्ये दोन दहशतवादी या ऑपरेशनमध्ये ठार केल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  हे ऑपरेशन तेकानबटपोरा या भागात सुरु आहे. CRPF च्या 182 क्रमांकाची बटालियन आणि जम्मू पोलिस हे ऑपरेशन पार पाडत आहेत. दोन्ही बाजूने फायरिंग सुरु आहे. सध्यातरी  दहशतवाद्यांची संख्या आणि त्यांच्या कोणत्याही दहशतवादी संघटनेची माहिती मिळालेली नाहीये. याबाबतची अधिक माहिती अद्याप मिळणे बाकी आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी आज बुधवारी पुलवामातील तेकानबटपोरा भागात सर्च ऑपरेशन केलं होतं. या दरम्यानच दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरु केला. सुरक्षादलांनी याला सडेतोड उत्तर देत कारवाई सुरु केली. सध्या हे ऑपरेशन सुरु असून सुरक्षा दल दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्याच्या तयारीत आहेत.

गेल्या महिन्यात जम्मू काश्मीरमधील नगरोटा एन्काऊंटरनंतर सुरक्षा दलांनी दहशतवादी आणि त्यांच्या मदतनीसांची शोधमोहिम सुरु केली होती. 21 नोव्हेंबर रोजी सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं. त्यांनी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या एका व्यक्तीला पुलवामातून अटक केली. तो आतंकवाद्यासोबत सक्रिय होता. सुरक्षा दलांनी त्याची माहिती मिळवून ऑपरेशन सुरु केलं. हा व्यक्ती दहशतवाद्यांसोबत सक्रिय होता. घटनास्थळी अधिक तपास केल्यानंतर जवळच्या एका मदरशाची तसेच एका दहशतवाद्यांची माहिती मिळाली. यानंतर सुरक्षादलांनी दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु केलं आणि त्याला अटक केली.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराटच्या सुरुवातीच्या तुफानानंतर बेंगळुरूत पावसाचं आगमन, सामना थांबला

Virat Kohli RCB vs CSK : मी एप्रिलमध्येच बॅग पॅक केली होती.... विराटला स्वतःच्या संघावर विश्वास नव्हता?

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : पुणे-मुंबई हायवेवर वाहतूक कोंडी, वाहतूक संथ गतीने

SCROLL FOR NEXT