Madan Mitra and sovan chatterjee
Madan Mitra and sovan chatterjee Sakal
देश

तुरुंगात गेल्यानंतर प्रकृती बिघडल्याचे कारण देत ‘तृणमूल’चे दोन नेते रुग्णालयात

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

कोलकता - ‘नारद स्टिंग ऑपरेशन’ (narad Sting Operation) प्रकरणात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांच्या सरकारमधील दोन मंत्री (Minister) व तृणमूल काँग्रेसचे दोन नेते यांना सोमवारी ‘सीबीआय’ने अटक (CBI Arrested) केल्यानंतर रात्री प्रेसिडेन्सी कारागृहात (Jail) पाठविण्यात आले. यातील आमदार मदन मित्रा आणि कोलकत्याचे माजी महापौर सोवेन चॅटर्जी यांना श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारीनंतर आज सकाळी एसएसकेएम रुग्णालयात (SSKM Hospital) दाखल करण्यात आले. (Two Trinamool Congress Leaders Hospitalized after Falling Sickness)

‘नारद’ प्रकरणी काल अटक झालेले मंत्री सुब्रत मुखर्जी (वय ७६) यांनाही बरे वाटत नसल्याने काल रुग्णालयात आणले. पण तपासणीनंतर तुरुंगात पाठविण्यात आले. आज दुपारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल केले. चौघांमध्ये मुखर्जी हे सर्वांत वयस्कर आहेत. अटक केलेल्यांमध्ये मंत्री फिरहाद हकीम यांचाही समावेश आहे. या चौघांना काल सीबीआयने अटक केली. सीबीआय न्यायालयात झालेल्या व्हर्च्युअल सुनावणीत त्यांची जामिनावर सुटका केली. मात्र रात्री कोलकता उच्च न्यायालयाने सीबीआय न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिल्याने चारही नेत्यांचा जामीन रद्द करण्यात आला व त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली. या नाट्यमय घडामोडींनंतर काल रात्री वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना प्रेसिडेन्सी तुरुंगात पाठविण्यात आले. यावेळी चारही नेत्यांच्या कुटुंबातील सदस्य तुरुंगाबाहेर उपस्थित असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, फिरहाद हकीम यांनी काल सीबीआयच्या कार्यालयाबाहेर ‘न्यायालयावर माझा पूर्ण विश्‍वास आहे. भाजप मला त्रास देण्यासाठी कोणाचाही वापर करू शकतो, असा आरोप केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT