Mami and Bhanji's same-sex wedding, Women's marriage in Indian culture 
देश

Mami-Bhanji Wedding : अजब प्रेमाची गजब कहानी! मामी भाचीच्या प्रेमात झाली वेडी; तीन वर्षांच्या अफेअरनंतर पळून जाऊन केलं लग्न

Two women get married in Gopalganj Bihar : बिहारच्या गोपालगंज येथे झालेल्या या लग्नाची सध्या सगळीकडं तुफान चर्चा सुरू आहे.

रोहित कणसे

बिहारच्या गोपालगंज येथे एक वेगळेच प्रेम प्रकरण समोर आले आहे. प्रेमात वेडी झालेल्या मामीने पतीला सोडून देत पळून जाऊन भाचीसोबत लग्नगाठ बांधल्याचा प्रकार समोर आला आहे. या दोघींनी पळून जाऊन लग्न केल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून याबद्दलची माहिती घरच्यांना कळवली. या दोघींमध्ये गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते असे सांगितले जात आहे.

बिहारमधील बेलवा येथील रहिवासी असलेल्या या मामी-भाचीने सर्व नाते बाजूला सारत दुर्गा मातेच्या मंदिरात आपलं लग्न उरकलं. मंदिरात पार पडलेल्या या लग्न सोहळ्यात सर्व रिती-रिवाज पूर्ण करण्यात आले. यादरम्यान दोघींनी एकमेकींना वरमाला देखील घातल्या इतकंच नाही तर गळ्यात मंगळसूत्र घालून सात फेरे देखील घेतले.

भाची शोभा हिच्या प्रेमात वेडी झालेल्या सुमन यांनी सांगितलं की शोभा खूपच सुंदर आहे. मला भीती वाटत होती की तिचं लग्न दुसरीकडे कुठेतरी होऊन जाईल आणि ती मला सोडून निघून जाईल. या भीतीपोटी आम्ही सर्वकाही सोडून देऊन मंदिरात लग्न केलं. तर शोभाने सांगितलं की सासामुसा मंदिरात आम्ही लग्न केले आहे. लग्न केल्यानंतर आम्ही सोबत राहण्याची शपथ घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान गोपालगंज येथील या मामी-भाचीचे लग्न चर्चेचा विषय बनला आहे. या अनोख्या लग्नाची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. सोशल मीडियावर या दोघींना आपल्या लग्नाची माहिती घरच्या मंडळींना दिली आहे. या व्हिडीओमध्ये दोघी स्वतःत्या मर्जीने लग्न करत असल्याचे सांगताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरण! संशयित आरोपी मनीषा मुसळे माने यांचा दोषमुक्त करण्याचा न्यायालयाकडे अर्ज, अर्जात नेमके काय? वाचा...

Thane Traffic: घोडबंदर मार्ग 6 तास पाण्याखाली, चालकांचा वाहतूक कोंडीसोबत सामना; ठाणेकरांचे हाल

Uruli Kanchan Crime : विनयभंग करत महिलेला जातिवाचक शिवीगाळ; खासगी सावकारावर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Updates: अमळनेरात पुराचा कहर; एकाचा मृत्यू, २४ तासांनंतरही शोध निष्फळ

Mumbai News: मुंबईत घर घेणं महागलं! नागरिकांच्या खिशाला फटका, 'इतक्या' टक्क्यांनी किमतीत वाढ, अहवाल समोर

SCROLL FOR NEXT