Uddhav Thackeray esakal
देश

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे ४ ऑगस्टला दिल्लीत; विधानसभेचे जागा वाटप होणार फायनल?

India Alliance : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागावाटपावरून चर्चा सुरू आहे.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

New Delhi: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या ४ ऑगस्टला दिल्लीत येणार असून ते ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांची सौजन्य भेट घेणार आहेत. यात समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल व आपचे खासदार संजय सिंह यांची भेट घेण्याची शक्यता आहे. काही महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक आहे. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागावाटपावरून चर्चा सुरू आहे.

अद्याप कोणताही फॉर्म्युला निश्चित झालेला नसला तरी ऑगस्ट महिन्यात जागावाटप पूर्ण होईल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे नेते करीत आहेत. या बाबत काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा होण्याची शक्यता आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आल्याने काँग्रेसचा जागावाटपांत अधिक जागा मागण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या जागावाटपाचा प्रश्न दिल्लीतील काँग्रेस श्रेष्ठींशी चर्चा केल्याशिवाय पूर्ण होणार नाही. यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट होण्याची शक्यता आहे.

यात महाराष्ट्रातील जागा वाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीनंतर ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीत येत असल्याचे खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील जागावाटपाचा प्रश्न महत्त्वाचा असला तरी याबाबत निर्णय घेण्यासाठी अजून काही दिवस असल्याचे खासदार सावंत यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FOREIGN JOB OPPORTUNITIES: या राशींच्या लोकांना मिळू शकते परदेशात जाण्याची संधी; करिअर आणि पैशांसाठी ठरू शकतो मोठा टर्निंग पॉइंट

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Water Scarcity : अंबड तालुक्यात पाणी टंचाईचे सावट: लघु,पाझर तलाव कोरडेठाक तर विहिरी, कूपनलिका ची पाणी पातळी चालली खालावत

CSK Head Coach: जहीर खानकडे चेन्नई सुपर किंग्सची धुरा! IPL 2027 साठी माजी भारतीय स्टारची हेड कोचपदी नियुक्ती, CSKचा मोठा निर्णय

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT