Kerala Crime News esakal
देश

Crime News : 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या प्रियकारनं कापले प्रेयसीचे दोन्ही हात; दोघांत जोरदार भांडण

प्रसिद्ध श्रद्धा वालकर खून प्रकरणाची आग शमली नसतानाच आता आणखी एक वेदनादायक प्रकरण समोर आलंय.

सकाळ डिजिटल टीम

प्रसिद्ध श्रद्धा वालकर खून प्रकरणाची आग शमली नसतानाच आता आणखी एक वेदनादायक प्रकरण समोर आलंय.

Murder in Live in Relationship : प्रसिद्ध श्रद्धा वालकर खून प्रकरणाची आग शमली नसतानाच आता आणखी एक वेदनादायक प्रकरण समोर आलंय. उधमसिंह नगरच्या गदरपूर येथील एका तरुणानं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीचे दोन्ही हात कापले.

उपचारादरम्यान या मुलीचा मृत्यू झाला. ही घटना सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. याला गावप्रमुखानेही दुजोरा दिला आहे. गदरपूरच्या महतोष गावात राहणारा तरुण केरळमधील कोची येथील एका ब्युटी पार्लरमध्ये सहा वर्षांपासून काम करत होता. यादरम्यान त्याची एका मुलीशी ओळख झाली. त्यानंतर दोघांत संवाद सुरू झाला आणि ते एकमेकांवर प्रेम करु लागले. प्रेम इतकं वाढलं की, दोघांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यास होकार दिला आणि राहायला सुरुवात केली.

प्रियकारने तरुणीचे दोन्ही हात कापले

3 डिसेंबरला दोघांत काही गोष्टीवरून आपापसात वाद झाला. त्यानंतर प्रियकारनं प्रेयसीचे दोन्ही हात कापले. यानंतर आजूबाजूच्या लोकांनी तरुणीला रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तिथं तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या वृत्ताबाबत तरुणाच्या नातेवाईकांकडून माहिती घेतली असता त्यांनी सांगितलं की, 'हा तरुण 23 नोव्हेंबरला आपल्या बहिणीच्या लग्नाला आला होता. लग्नानंतर तीन दिवसांनी तो निघून गेला.' गावप्रमुख नवी जान म्हणाले, मी याबाबतचं वृत्त न्यूज चॅनल आणि सोशल मीडियावर पाहिलं. या भागातील काही तरुण केरळमधील कोची इथं पार्लरमध्ये काम करतात, असं सांगितलं जात आहे. दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि वाद झाल्यानंतर तरुणानं तरुणीचे दोन्ही हात कापले. याबाबतची अधिक माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाहीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Law: नामांकन वादांना पूर्णविराम? निवडणूक कायद्यात बदलांना मंजुरी; महापालिका निवडणुकीआधी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय!

Gen-Z Post Office: मुंबईत पहिले जेन-झी पोस्ट ऑफिस! विद्यार्थ्यांना विशेष फायदा होणार, काय आहेत सुविधा?

Railway Luggage Rules : विमानासारखेच नियम रेल्वेमध्येही लागू होणार! , ‘फर्स्ट एसी’मध्ये ७० किलो पर्यंतच सामान मोफत नेता येणार

Latest Marathi News Live Update : अधिकारी-कर्मचारी महासंघाचा उद्यापासून ‘कामबंद’चा इशारा

Pune Crime : अमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई; साडेतीन कोटींचे अमली पदार्थ जप्त; पाच जणांना अटक!

SCROLL FOR NEXT