pm modi scheme Ujjwala gas sakal
देश

LPG Gas : उज्ज्वला योजनेचा विस्तार! 75 लाख महिलांना मिळणार मोफत कनेक्शन, मंत्रिमंडळाची मंजुरी

संतोष कानडे

नवी दिल्लीः आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. उज्ज्वला गॅस योजनेमध्ये नव्याने ७५ लाख महिलांना लाभ मिळणार आहे. या योजनेचा विस्तार होणार असून निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी यासंबंधीची माहिती देताना सांगितलं की, उज्ज्वला योजने अंतर्गत आतापर्यंत ८.६० कोटी एलपीजी सिलिंडर वितरित केले गेले आहेत. आता नवीन ७५ लाख कनेक्शन मोफत देण्यात येणार आहेत. गरजू आणि गरीब महिलांना याचा फायदा होईल, असं ठाकूर यांनी सांगितलं.

अनुराग ठाकूर यांनी पुढे सांगितलं की, तीन वर्षांमध्ये ७५ लाख एलपीजी कनेक्शन वितरित केले जाणार आहेत. यासाठी तब्बल १ हजार ६५० कोटी रुपये खर्च केले जाणार असून त्यामुळे आता या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या १० कोटी इतकी होईल.

दरम्यान, मागच्याच महिन्यात केंद्र सरकारने ७५ लाख नवीन कनेक्शनसंदर्भात घोषणा केली होती. यासाठी लागणाऱ्या निधीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. हा निधी सार्वजनिक क्षेत्रातल्या पेट्रोलियम विपणन कंपन्यांकडे वर्ग केला जाईल.

उज्ज्वला योजनेची सुरुवात मे २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. या योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन दिलं जातं. आता या योजनेचा विस्तार झालेला असून आणखी ७५ लाख कनेक्शन दिले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT