S Jaishankar esakal
देश

S Jaishankar News: BBC चा मुद्दा उकरून काढताच जयशंकरांचं ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांना सडेतोड उत्तर; म्हणाले, संस्थांनी कायद्याचं..

जयशंकर (S Jaishankar) यांनी ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांना सडेतोड उत्तर दिलं.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : ब्रिटनचे परराष्ट्र सचिव जेम्स क्लेव्हरली (James Cleverly) यांनी आज (बुधवार) एस जयशंकर यांच्यासमोर ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कंपनीच्या (British Broadcasting Company BBC) कार्यालयांवर आयकर विभागाच्या (IT) सर्वेक्षणाचा मुद्दा उपस्थित केला.

यादरम्यान जयशंकर (S Jaishankar) यांनी ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांना सडेतोड उत्तर दिलं. जयशंकर म्हणाले, भारतात काम करणाऱ्या सर्व संस्थांनी कायदे आणि नियमांचं पूर्णपणे पालन केलं पाहिजे. क्लेव्हरलींनी एजन्सीला सांगितलं की, त्यांनी आयटी सर्वेक्षणाचा मुद्दा जयशंकर यांच्याकडं मांडला होता.

जेम्स क्लेव्हरली भारत दौऱ्यावर

जेम्स क्लेव्हरली जी-20 परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात आले आहेत. क्लेव्हरली आणि जयशंकर यांची आज सकाळी द्विपक्षीय बैठक झाली. भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलं की, यंग प्रोफेशनल स्कीम सुरू केल्याबद्दल त्यांनी भारताचं विशेष कौतुक केलं.

विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात आयटी टीमनं बीबीसीच्या मुंबई आणि दिल्लीतील कार्यालयांची झडती घेतली होती. तीन दिवस चाललेल्या या सर्वेक्षणात असं दिसून आलं की, बीबीसीनं भारतातील त्यांच्या कामकाजाच्या अनुषंगानं त्यांचं उत्पन्न आणि नफा उघड केला नाही.

बीबीसीनं कर योग्य पद्धतीनं भरला नसल्याचं तपासात समोर आलं. यावेळी आयटी पथकानं कर्मचाऱ्यांचे जबाब घेऊन पुरावे गोळा केले.

वादग्रस्त माहितीपटामुळं बीबीसी चर्चेत

अलीकडं बीबीसी आपल्या वादग्रस्त माहितीपटामुळं चर्चेत आली आहे. हा माहितीपट 2002 च्या गुजरात दंगलीवर आधारित होता. केंद्र सरकारनं या माहितीपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातलीये. अनेक विरोधी पक्षांनीही सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahadev Jankar: भाजपला सत्तेत येण्‍यास मदत केल्याबद्दल माफी मागायला आलाेय: माजी मंत्री महादेव जानकर; लोकशाही संपवून देशात हुकूमशाही सुरू !

Hadapsar Robbery : 'अपघाताचे नाटक' करून ट्रकचालकाला लुटले; हडपसरच्या मगरपट्ट्यातील घटनेत तीन चोरट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Latest Marathi News Live Update : अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ल्यातील भोकरच्या सभेत मंत्री संजय शिरसाट यांची फटकेबाजी

धक्कादायक प्रकार! चौथीही मुलगी झाली म्हणून आईने पोटच्या तीन दिवसांच्या नवजात बालिकेचा गळा दाबून केला खून

Ladki Bahin Yojana: ‘लाडक्या बहिणीं’ना ‘लखपती’ करणार; मुख्यमंत्री फडणवीस, खुलताबाद येथे भाजपतर्फे प्रचार सभा

SCROLL FOR NEXT