Rishi Sunak Esakal
देश

Rishi Sunak: ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक सपत्निक पोहोचले अक्षरधाम मंदिरात; भर पावसात जाऊन घेतलं दर्शन

भगवान स्वामी नारायणाचे घेतलं दर्शन

अंकिता खाणे (Ankita Khane)

G20 परिषदेच्या निमीत्ताने अनेक देशाचे पंतप्रधान राजधानी दिल्लीमध्ये आले आहेत. अशातच ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आज (रविवारी) सकाळी पाऊस सुरू असताना पत्नी अक्षता मूर्तीसोबत अक्षरधाम मंदिरात पोहोचले. येथे त्यांनी सर्व विधींसह भगवान स्वामी नारायणाचे दर्शन घेतले.

पावसात पीएम सुनक पत्नीसह मंदिरात पोहोचले होते. G20 परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात पोहोचल्यावर पंतप्रधान सुनक म्हणाले की, मला हिंदू असल्याचा अभिमान आहे. यावेळी मंदिराबाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आपली पत्नी अक्षता मूर्तीसोबत भारतात आले आहेत. ते त्यांच्या पत्नीसह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयोजित केलेल्या डिनरला देखील उपस्थित होते, यावेळी त्याचे स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपतींनी स्वागत केले.

जी -20 परिषदेचा दुसरा दिवस

नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या जी-20 परिषदेचा आजचा दुसरा दिवस आहे. पंतप्रधान मोदी आज 9 देशांच्या प्रमुखांची भेट घेणार आहेत. तर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत ते द्विपक्षीय बैठक घेणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे शहरात सिमेंट काँक्रिट उखडले; रस्त्यावर पुन्हा खड्डे

Pali Census : 40 ते 42 अंश सेल्सिअस तापमानात 'सुपरहिरो' बनून फिरतायत शिक्षक; उन्हाच्या लाहीलाहीतही जनगणनेचे राष्ट्रीय कर्तव्य अविरत सुरू

Nashik POCSO Case : नाशिकमध्ये गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा; 15 वर्षांच्या विद्यार्थिनीचे फोटो काढून शिक्षकाने केले ब्लॅकमेल, मनसूरचे धक्कादायक कृत्य

Amit Shah: ''शक्य तेवढ्या लवकर आपल्या देशात निघून जा'', अमित शाहांचा इशारा; 'ती' जमीन बीएसएफकडे सुपूर्द

Pimpri News : फुगेवाडीत सलग मृत्यूंनी खळबळ; हातभट्टी दारूची चर्चा, पोलिसांचा इन्कार

SCROLL FOR NEXT