S Jayshankar  Sakal
देश

"भारताने शांततेची बाजू निवडली आहे", युक्रेनवर परराष्ट्रमंत्र्यांचे भाष्य

खून, रक्तपात आणि निष्पाप लोकांची हत्या करून कोणताही निष्कर्ष निघू शकत नाही.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : युक्रेनमधील संघर्षाचे (Russia Ukraine War) जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि भारताच्या अर्थव्यवस्थेवर (Ukraine Crises Impact On World Economy) महत्त्वपूर्ण परिणाम झाले आहेत, असे मत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बुधवारी लोकसभेत बोलताना व्यक्त केले आहे. युद्धाने वाद सोडवता येत नाही. संवाद आणि मुत्सद्देगिरीने वाद मिटवले पाहिजेत असे ते म्हणाले. सर्व देशांप्रमाणे सरकारदेखील परिणामांचे मूल्यांकन करत असून, राष्ट्रीय हितासाठी काय सर्वोत्तम करता येईल यावर विचार केला जात असल्याचे जयशंकर यांनी यावेळी स्पष्ट केले. युक्रेन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात चर्चा व्हावी अशी भारतीची भूमिका असल्याचे ते म्हणाले. ते युक्रेन आणि रशिया यांच्यातील सुरु असलेल्या युद्धमुळे उद्बवलेल्या परिस्थितीवर लोकसभेत बोलत आहेत. (Dr. S Jayshankar On Ukraine )

युक्रेनच्या मुद्द्यावर भारताचे पहिले मत आहे की, भारत या संघर्षाच्या विरोधात आहोत. 'खून, रक्तपात आणि निष्पाप लोकांची हत्या करून कोणताही निष्कर्ष निघू शकत नाही', असा भारताचा विश्‍वास आहे. आजच्या काळात कोणताही वाद संवाद आणि मुत्सद्देगिरीने सोडवण्याचा योग्य मार्ग आहे, असेदेखील त्यांनी यावेळी सांगितले. ऑपरेशन गंगा हे मोठे आव्हान असल्याचे ते म्हणाले. युद्धाच्या वेळी भारत सरकारने भारतीय नागरिकांना युक्रेनमधून नागरिकांना सुखरूप बाहेर काढल्याचे सांगत तेथील विद्यार्थ्यांनी खूप धाडस दाखवले. यावेळी त्यांनी ऑपरेशन गंगा अंतर्गत भारतीय विद्यार्थांच्या सुटकेसाठी युक्रेनमध्ये गेेलेल्या मंत्र्यांसह सर्व टीमचे कौतुक केले.

ऑपरेशन गंगाबद्दल बोलताना जयशंकर म्हणाले की, केंद्र सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्या सुमारे 20 हजार भारतीयांना सुखरूप बाहेर काढले. यासोबतच इतर देशांतील नागरिकांनाही तेथून बाहेर काढले. भारताच्या या कामगिरीचे बाकी देश आज उदाहरण देत आहे. पंतप्रधानांनी स्वतः नेत्यांशी संवाद साधला, जिथे लोक अडकले होते, तिथे युद्धबंदी झाली.खारकिव्ह आणि सुन्नीमध्ये परिस्थिती वाईट होती. याबाबत पंतप्रधान मोदींनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे विद्यार्थ्याला सेफ झोन मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

युक्रेनच्या बुचाकडून नागरिकांच्या हत्येचे वृत्त चिंताजनक असल्याचा पुनरुच्चार भारताने संयुक्त राष्ट्रातही केला आहे. याची स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी आमची मागणी आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत आतापर्यंतच्या कठोर विधानात भारताचे राजदूत टीएस तिरुमूर्ती म्हणाले, 'युक्रेनमधील बुचा येथे नागरिकांच्या मृत्यूचे अलीकडील अहवाल अस्वस्थ करणारे आहेत. भारत या हत्यांचा स्पष्टपणे निषेध करतो आणि या प्रकरणाच्या स्वतंत्र तपासाचे समर्थन करत असल्याचे म्हटले आहे. यासह भारताने हिंसाचार त्वरित संपवण्याच्या आणि शत्रुत्वाचा अंत करण्याच्या आवाहनाचा पुनरुच्चार केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT