Rajnath Singh 
देश

Ukraine-Russia : भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणतात...

सकाळ डिजिटल टीम

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेनं मंगळवारी तात्काळ बैठक बोलावली. यावेळी भारतानेही आपली भूमिका मांडली.

न्यूयॉर्क - युक्रेनमध्ये (Ukraine) सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. रशियाचे (Russia) राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी युक्रेनमध्ये विद्रोहींच्या ताब्यात असलेल्या दोन प्रांतांना स्वतंत्र देश म्हणून घोषणा केली. त्यासंदर्भात कायद्यावर सहीसुद्धा त्यांनी केली आहे. रशियाच्या या निर्णयानंतर युक्रेनवर रशियाकडून आक्रमण केलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेनं मंगळवारी तात्काळ बैठक बोलावली. यावेळी भारतानेही आपली भूमिका मांडली. संयुक्त राष्ट्रातील भारताचे प्रतिनिधी टी एस तिरुमूर्ति यांनी सांगितलं की, रशिया युक्रेन यांच्यातील सीमेवर वाढता तणाव हा चिंतेचा विषय आहे. या संघर्षामुळे दोन्ही देशांमध्ये शांतता आणि सुरक्षा कमकुवत झाली आहे.

युक्रेनवर ओढावलेल्या संकटावर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. चर्चेतून यावर तोडगा काढायला हवा आणि शांतता निर्माण करायला हवी. मला विश्वास आहे की रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यातील चर्चेतून काहीतरी मार्ग निघेल. भारत आंतरराष्ट्रीय शांतता कायम राखण्याच्या बाजूने आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष वाढत चालल्याचं दिसताच भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी विशेष विमाने पाठवली जाणार आहेत. युक्रेनच्या खार्किवमधून २५६ भारतीय विद्यार्थी परत येतील. तर एअर इंडियाची विमानेही युक्रेनला पाठवण्यात आली आहेत. २०० प्रवाशी एका वेळी मायदेशी येऊ शकतील. 24 आणि 26 फेब्रुवारीलासुद्धा विमाने पाठवली जाणार आहेत.

रशियन राष्ट्राध्यक्षांनी सांगितलं की, 'युक्रेन अमेरिकेची वसाहत बनला आहे. इथंलं सरकार अमेरिकेच्या हातातलं बाहुलं बनलं आहे.' पुतिन यांच्या या वक्तव्यावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांनी थेट रशियाला इशारा देत आम्ही घाबरत नाही असं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narayangaon Protest: मिलिंद एकबोटे यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्याचा नारायणगावात तीव्र निषेध, कायदेशीर कारवाईची मागणी

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT