Unacademy esakal
देश

Unacademy कडून 'त्या' शिक्षकाला घरचा रस्ता; अरविंद केजरीवाल यांची टीका

सकाळ डिजिटल टीम

Unacademy Tutor Fired teacher Over Vote For Educated politicians Remark

नवी दिल्ली- Unacademy च्या एका शिक्षकाने ऑनलाईन क्लासेसदरम्यान शिक्षित लोकांना मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. यानंतर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. शिक्षण देत असताना असा सरकारविरोधी अजेंडा राबवणे योग्य नाही म्हणत अनेकांनी शिक्षकावर टीका केली. त्यानंतर Unacademy कडून त्या शिक्षकाला घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यावरुन टीका केली आहे.

शिक्षित लोकांना मतदान करा असं म्हणण्यात गुन्हा आहे का? एखादा अशिक्षित आहे, तर मला वैयक्तिक त्याच्याबद्दल आदर आहे. पण, देशाचे प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती अशिक्षित असता कामा नये. हे युग विज्ञान-तंत्रज्ञानाचे आहे. अशिक्षित लोक २१ व्या शतकातील आधुनिक भारत घडवू शकत नाहीत, असं मत केजरीवाल यांनी व्यक्त केलं. त्यांनी 'एक्स'वर पोस्ट केली आहे.

Unacademy च्या करण सागवान यांनी १२ ऑगस्ट रोजी ऑनलाईन क्लास घेताना विद्यार्थ्यांना अशिक्षित लोकांना मतदान करु नका असं म्हटलं होतं. Unacademy वर झालेल्या टीकेनंतर सागवान यांना संस्थेतून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.

Unacademy ने यावर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की, संस्था अशाप्रकारे वैयक्तिक मते विद्यार्थ्यांसमोर ठेवण्याची परवानगी देत नाही. सागवान यांनी कराराचा भंग केला असून त्यामुळे शिक्षणात चुकीचा पायंडा पडत आहे. Unacademyचे सह-संस्थापक रोमन सैनी यांनी पोस्ट करुन यासंबंधी माहिती दिली.

करण सागवान यांनी नेमकं काय म्हटलं होतं?

अशिक्षित नेत्यांना मतदान करुन नका. ज्यांना फक्त नाव बदलायचं माहिती आहे, त्यांना मदतान करुन पुन्हा फसू नका. लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही पुठच्या वेळेस मतदान कराल, अशिक्षित लोकांना मत देऊ नका. जेणेकरुन तुम्हाला पुन्हा अशा परिस्थितीला सामोरे जावे लागणार नाही. एका चांगल्या शिक्षित नेत्याची तुम्ही निवड करा. ज्याला गोष्टी समजत असतील. तुमचा निर्णय योग्य असू द्या, असं करण सागवान म्हणाले होते. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS तुकाराम मुंढेंना मातृशोक, पुण्यात आईचं निधन; बीडमध्ये होणार अंत्यसंस्कार

Satara District Bank: राज्य सरकारकडून सातारा जिल्हा बँकेच्या भरतीला स्थगिती; भरती प्रक्रियेत गैरव्यवहार, कायदेशीर लढ्याला यश!

Latest Marathi News Live Update : दक्षिण रायगडमध्ये ढगाळ वातावरण; जोरदार वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा इशारा

Karad News: अतिक्रमणे हटवली; हॉकर्स झोन करा, कऱ्हाडला हातगाडाधारक आग्रही; किरकोळ विक्रेत्यांसाठी नियोजनबद्ध जागेची मागणी

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या उत्तरानंतर ग्रीनने घेतला बॉल हातात, KKR साठी गोलंदाजीला आजच उतरणार?

SCROLL FOR NEXT