देश

'माझ्या 65 हजारच्या नोटा बदलून द्या'; मोदीजी, या दृष्टीहीनाची ही कैफियत ऐका!

सकाळ डिजिटल टीम

“मला माझे ६५ हजार बदलून द्या. ही माझ्या जीवनाची कमाई आहे;” नोटबंदीपासून अनभिज्ञ दृष्टीहिनाने मांडली कैफियत...

नोटाबंदी होऊन अनेक वर्ष लोटली तरी नोटबंदीचे परिणाम अजूनही दिसत आहेत. खरंतर नोटाबंदीचे चांगले-वाईट सर्व परिणाम आता सर्वांनी स्वीकारले आहेत. किंबहुना ते स्वीकारणं सर्वांना भाग होतं. पण तमिळनाडूतील एका घटनेनं नोटाबंदीच्या आठवणी पुन्हा ताज्या केल्या आहेत आणि त्याला कारणीभूत ठरलाय तमिळनाडूतील एक दृष्टीहीन भिकारी... या भिकाऱ्याची कैफियत ऐकून तुम्हालाही गहिवरुन आल्याशिवाय राहणार नाही.

तामिळनाडूतील ६५ वर्षीय दृष्टिहीन व्यक्तीने कृष्णागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात एक याचिका दाखल केली आहे. त्याच्याकडे असलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या (डिमॉनेटाइज्ड) नोटा बदलण्यासाठी त्याने मदत मागितली आहे. ही रक्कम त्याच्या जीवनाची बचत आहे, जी त्याने भीक मागून कमावली आहे, असा दावा त्याने केला आहे.

चिन्नाकन्नू हा मूळचा तमिळनाडूतील कृष्णागिरी जिल्ह्यातील चिन्नागौंडनूर गावचा रहिवासी आहे. वयाच्या पाचव्या वर्षापासून तो दृष्टिहीन आहे. भीक मागून तो उदरनिर्वाह करत होता आणि आपल्या गावात झोपडीत एकटाच राहत होता. या परिस्थितीबद्दल विचारले असता, त्याने एका वृत्तवाहिनीला सांगितले की, चार वर्षांपूर्वी तो आजारी पडला होता आणि त्यादरम्यान त्यानं आपली ६५००० रुपयांची आजीवन बचत कोठे ठेवली, हे विसरलो होता. त्याने दावा केला की, काही दिवसांपूर्वीच त्याला पैसे सापडले. त्याला नंतर कळले की, नोटाबंदीमुळे त्याची आजीवन बचत रक्कम आता वापरता येणार नाही.

याचिकेत तो म्हणाला की, अनेक वर्षांपासून तो या परिसरात भीक मागत आहे आणि म्हातारपणात वापरण्याची आशा बाळगून ही रक्कम वाचवली होती. गेल्या काही वर्षांपासून एका आजारामुळे त्याने ती रक्कम कोठे ठेवली होती, हे तो विसरला होता आणि नोटाबंदीची माहिती नसल्याने तो नोटा बदलू शकला नाही. त्याचं म्हणणं जिल्हाधिकारी ऐकणार का? आणि त्याला ती परत रक्कम मिळणार का ? हे अनिश्चित आहे, पण या घटना नोटबंदीच्या आठवणी ताज्या करते हे नक्की. पंतप्रधान मोदींपर्यंत या दृष्टीहीनाची कैफियात पोहोचतेय का आणि त्याला त्याचे पैसे परत मिळतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT