देश

Unemployment : देशात बेरोजगारीचा आलेख 8.3 टक्क्यांवर; ग्रामीण भागातही स्थिती बिकट

देशातील बेरोजगारीचा दर ऑगस्ट महिन्यामध्ये 8.3 टक्क्यांवर

सकाळ डिजिटल टीम

देशातील बेरोजगारीचा दर ऑगस्ट महिन्यामध्ये 8.3 टक्क्यांवर पोहोचला आहे. या मागच्या महिन्याच्या तुलनेत रोजगार 20 लाखांनी घटून तो 39.46 कोटींवर आला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE)ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, जुलैमध्ये बेरोजगारीचा दर 6.8 टक्के होता तर, रोजगार 397 दशलक्ष इतका होता.

सीएमआयईचे व्यवस्थापकीय संचालक महेश व्यास यांनी पीटीआयला (PTI) दिलेल्या माहितीनुसार, “शहरी बेरोजगारीचा दर सामान्यतः ग्रामीण बेरोजगारीच्या दरापेक्षा जास्त आहे, यावेळी शहरी बेरोजगारीचे प्रमाण 8 टक्के, तर ग्रामीण बेरोजगारीचा दर सुमारे 7 टक्के इतका झाला आहे.”

एकीकडे भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत आहे. भारताने ब्रिटनला मागे टाकून जगात 5 नंबरचे स्थान मिळवले आहे. त्याचवेळी अर्थव्यवस्थेसमोर मंदी, बेरोजगारी, उद्योग- धंदे, कर्ज दरातील वाढ अशा एक ना अनेक संकटे देशासमोर उभी राहिली आहे.

ऑगस्टमध्ये, शहरातील बेरोजगारीचा दर 9.6 टक्क्यांवर गेला आहे. तर ग्रामीण बेरोजगारीचा दर 7.7 टक्क्यांवर गेला आहे. देशातील ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर जुलैमध्ये 6.1 टक्क्यांवरून ऑगस्टमध्ये 7.7 टक्क्यांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे रोजगार दर 37.6 टक्क्यांवरून 37.3 टक्क्यांवर घसरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT