Child Food  
देश

UNICEF: लहान मुलांना पोटभर अन्नही मिळेना! जगातील 20 सर्वात वाईट देशांमध्ये भारताचा समावेश; पाकिस्तानची स्थिती बरी- रिपोर्ट

Child Food Poverty: भारताचा जगातील खराब २० देशांमध्ये समावेश होतो. भारतातील लहान मुलांना योग्य आणि आवश्यक आहार मिळत नाही असं रिपोर्ट सांगतो.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- लहान मुलांच्या अन्न गरिबीबाबत यूनिसेफचा एक रिपोर्ट समोर आला आहे. यामध्ये भारताची स्थिती अत्यंत खराब असल्याचं सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे भारत लहान मुलांच्या अन्न सुरक्षेबाबत पाकिस्तानपेक्षा वाईट स्थितीमध्ये आहे. भारताचा जगातील खराब २० देशांमध्ये समावेश होतो. भारतातील लहान मुलांना योग्य आणि आवश्यक आहार मिळत नाही असं रिपोर्ट सांगतो.

दक्षिण आशियाई देशांमध्ये सर्वात वाईट स्थिती अफगाणिस्तानची आहे. जगातील प्रत्येक चौथे लहान मुल हे भूकबळीचा सामना करत आहे. १८१ मिलियन मुलांपैकी ६५ टक्के लहान मुलं यांना योग्य आणि पुरेसे अन्न मिळत नसल्याचा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

चारपैकी एक मुलगा गंभीर श्रेणीमध्ये येतो. अशा मुलांना पुरेसे अन्न मिळत नाही किंवा खराब अन्न खाऊन जीवन जगावं लागतं. चाईल्ड न्यूट्रीशन रिपोर्ट २०२४ मध्ये हा दावा करण्यात आलाय. रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, या अभ्यासाठी ९१ देशांचा समावेश करण्यात आला होता. या अभ्यासात पाच वर्षे वयापर्यंतच्या मुलाचा समावेश करण्यात आला होता.

अभ्यासामध्ये गरीब आणि त्याच्यापेक्षा वरच्या श्रेणीमध्ये जगणाऱ्या लोकांना समावेश करण्यात आला होता. लहान मुलांना पौष्टिक आणि विविध प्रकारचा आहार मिळत आहे का नाही? याची माहिती घेतली गेली. मुलांना मिळणारे वाईट अन्न, खराब वातावरण, कुटुंबाचे उत्पन्न या गोष्टींचा अभ्यासामध्ये समावेश करण्यात आला होता.

भारताची स्थिती दयनीय!

भारताचा बाल गरिबीचा आकडा ४० टक्के आहे. त्यामुळे हे गंभीर श्रेणीमध्ये येतं. पाकिस्तानची आपल्यापेक्षा थोडीशी बरी स्थिती आहे. पाकिस्तानचा बाल गरिबीचा आकडा ३८ टक्के आहे. अफगाणिस्तानमध्ये ४९ टक्के बाल गरिबी आहे. भारतापेक्षा सोमालिया, गिनी-बिसाऊ, सिएरा लियोन, इथियोपिया, लायबेरिया यांची स्थिती अत्यंत वाईट आहे. रिपोर्टनुसार, भारताच्या सर्वात वाईट देशांच्या यादीमध्ये पहिल्या २० मध्ये समावेश होतो. भारतातील लहान मुलांना पोषक आणि आवश्यक अन्न मिळत नाहीये, असं रिपोर्ट सांगतो.

जगातील ५ वर्षाखालील ३ पैकी २ लहान मुलं भूकबळीचे शिकार आहेत. यूनिसेफचा रिपोर्ट भारतातसाठी धक्कादायक आहे. रिपोर्टमध्ये अफगाणिस्ताननंतर आशियामध्ये भारताची सर्वात वाईट स्थिती असल्याचं सांगण्यात आलं आहे. भारतातील ४० टक्के लहान मुलं गंभीर बाल अन्न गरिबीच्या श्रेणीत, तर ३६ टक्के मुलं मध्यम बाल अन्न गरिबीच्या श्रेणीमध्ये आहेत. ही स्थिती वाईट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: धाराशिवमध्ये पावसाला सुरुवात

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

SCROLL FOR NEXT