jamia 
देश

दिल्लीत जामियाबाहेर पुन्हा गोळीबार; तिसरी घटना

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिल्लीतील जामिया मिलिया विद्यापीठाबाहेर पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली असून, दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामिया मिलिया विद्यापीठाच्या गेट नंबर 5 जवळ रविवारी रात्री उशिरा गोळीबार झाला. दुचाकीवरून आलेल्या दोन संशयितांनी गोळीबार केला. गेल्या चार दिवसांतील दिल्लीतील गोळीबाराची ही तिसरी घटना आहे. जामिया, शाहीनबाग आणि आता पुन्हा जामिया विद्यापीठाबाहेर गोळीबार झाला आहे. या गोळीबारामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. 

जामियाबाहेर झालेल्या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. गोळीबाराची माहिती मिळताच जामिया मिलिया इस्लामियाबाहेर लोक जमा झाले आणि त्यांनी निदर्शने केली. पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले आहे, गेट क्रमांक 5 आणि 7 मधील सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्यात येईल. सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसीच्या विरोधात जामिया परिसरात आंदोलन सुरु आहे. रविवारी शाहिनबाग येथे सायंकाळी पाचच्या सुमारास एका युवकाने गोळीबार केला होता. गोळीबार करणाऱ्या युवकाचे नाव कपिल गुज्जर (रा. दल्लुपुरा, उत्तर प्रदेश) असे आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आणि आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. या गोळीबारात कोणीही जखमी झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

५४७ मिनिटं, ३३४ चेंडूत १७९ धावा... टेम्बाने कांगारुंना फोडला घाम, रोहित शर्माचा विक्रम मोडला

Pandharpur Killed Case : धक्कादायक घटना! पंढरपूर तालुक्यात अनैतिक संबंधातून तरुणाचा निर्घृण खून; पिकअप गाडी अंगावर घालून दगडाने ठेचलं, आरोपी कैलास बाबर विरोधात गुन्हा दाखल

Airfare Rules India: विमान भाडे आता सरकारी नियंत्रणाबाहेर आपत्कालीन स्थितीतच सरकारचा हस्तक्षेप

Asian Para Games 2026: आधी कांस्य, आता सुवर्ण! आयुष वर्माची आशियाई पॅरा गेम्समध्ये कमाल...भारताला मिळवून दिलं दहावं गोल्ड

Tiger Shroff Car Firing : टायगर श्रॉफ प्रकरणात नवा ट्विस्ट, राधा अन् बबिता दिल्लीहून मुंबईला आल्या अन्...

SCROLL FOR NEXT