Government employees esakal
देश

Unified pension scheme: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; युनिफाईड पेन्शन योजनेला मंजुरी, काय आहे तरतूद?

New Pension Scheme Marathi News: नीवन योजनेच्या माध्यमातून जर एखाद्या कर्मचाऱ्याने किमान 25 वर्षे काम केले असेल, तर निवृत्तीपूर्वीच्या नोकरीच्या शेवटच्या 12 महिन्यांच्या मूळ वेतनाच्या 50 टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल.

संतोष कानडे

Central Government: केंद्र सरकारने एका नवीन पेन्शन योजनेला शनिवारी मंजुरी दिली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. युनिफाईड पेन्शन स्कीम असं या योजनेचं नाव आहे.

जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी जोर धरत असतानाच आता केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारने आता नवीन पेन्शन योजना अर्थात एनपीएसच्या ऐवजी युनिफाईड पेन्शन स्कीम लागू केली आहे. या एकीकृत पेन्शन योजनेला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मंजुरी मिळाली आहे.

या नीवन योजनेच्या माध्यमातून जर एखाद्या कर्मचाऱ्याने किमान 25 वर्षे काम केले असेल, तर निवृत्तीपूर्वीच्या नोकरीच्या शेवटच्या 12 महिन्यांच्या मूळ वेतनाच्या 50 टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल.

जर एखाद्या निवृत्तीवेतनधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला कर्मचाऱ्याच्या मृत्यूपर्यंत मिळालेल्या पेन्शनपैकी 60 टक्के रक्कम मिळेल. 10 वर्षांनंतर कोणी नोकरी सोडल्यास त्याला 10,000 रुपये पेन्शन मिळेल. युनिफाईड पेन्शन योजनेचा सुमारे 23 लाख कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

काय आहे नवीन योजना?

  • जर एखाद्या कर्मचाऱ्याने किमान 25 वर्षे काम केले असेल, तर त्याला निवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या 12 महिन्यांच्या सरासरी पगाराच्या किमान 50 टक्के रक्कम मिळणार

  • पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला मृत्यूच्या वेळी मिळालेल्या पेन्शनपैकी 60 टक्के रक्कम मिळते

  • जर 10 वर्षांनी नोकरी सोडली तर कर्मचा-यांना 10,000 रुपये पेन्शन मिळेल

  • कर्मचाऱ्यांना NPS किंवा UPS यापैकी एक पर्याय निवडायचा अधिकार असेल

  • पेन्शनमध्ये सध्या कर्मचाऱ्यांचा 10 टक्के वाटा आहे तर केंद्र सरकारचा 14 टक्के हिस्सा आहे

  • यापुढे आता केंद्र सरकारचा 18 टक्के हिस्सा असेल. नवीन योजना 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे.

नवीन पेन्शन योजनेनुसार 1 जानेवारी 2004 नंतर रुजू झालेल्या परंतु सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाही ही नवीन योजना लागू होईल. तसेच या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर पहिल्या वर्षी 800 कोटींचा बोजा पडणार असून त्यानंतर सुमारे 6000 कोटींचा बोजा सरकारी तिजोरीवर पडेल, अशी माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Drought Relief: पाच हजारांची मदत ७३ लाख शेतकऱ्यांना;फडणवीस : उर्वरितांना दोन दिवसांत रक्कम मिळणार

Satara Farmer Loan Waiver: सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ३४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ, चौथी यादी जाहीर

Navi Mumbai: माजी मंत्र्याचा अनधिकृत कारभार? मोरबे धरण क्षेत्रात अलिशान फार्म हाऊसची उभारणी, नवा वाद पेटण्याची शक्यता

Latest Marathi News Live Update : गोंदियातील ५१ शिवभोजन केंद्रचालकांचं ५ महिन्यांचं अनुदान प्रलंबित

IPL 2027 Trade: चेन्नई सुपर किंग्सने हार्दिक पांड्याला 'ठेंगा' दाखवला; SRH चे दोन तगडे खेळाडू आपल्या संघात घेतले, त्याबदल्यात कोणाला दिले?

SCROLL FOR NEXT