Union Budget Updates esakal
देश

Union Budget 2023: मध्यमवर्गीयांसाठी खूशखबर! आता सात लाखांपर्यंत इन्कम टॅक्स नाही; अर्थमंत्र्यांची घोषणा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मध्यमवर्गीयांसाठी मोठी घोषणा केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Union Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मध्यमवर्गीयांसाठी मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, आता सात लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही. यापूर्वी ही मर्यादा ५ लाख रुपये होती. त्याचबरोबर निर्मला सीतारामण यांनी नव्या टॅक्स लॅबमध्ये देखील मोठा दिलासा दिला आहे.

टॅक्स स्लॅबमध्ये बदल

नव्या कर रचनेनुसार आता 5 स्लॅब असणार आहेत. याची सुरुवात २.५ लाखांपासून सुरु होणार आहे. यापूर्वी या कर प्रणालीत 6 स्लॅब होते. यामध्ये आता तीन लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर असणार नाही.

अशी असेल नवी कर रचना

सीतारामण यांच्या घोषणेनुसार, वैयक्तिक टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार, ०-३ लाखांपर्यंत कोणताही कर असणार नाही. त्यानंतर ३-६ लाखांपर्यंत ५ टक्के तर ६-९ लाखांपर्यंत १० टक्के, ९-१२ लाखांपर्यंत १५ टक्के त्यानंतर १२-१५ लाखांसाठी २० टक्के आणि १५ लाखांच्यावर ३० टक्के कर भरावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT