pm modi esakal
देश

Modi Cabinet : लॉजिस्टिक्स पॉलिसीला मंजूरी; वाचा मोदींनी मंजूर केलेले महत्त्वाचे निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक झाली.

सकाळ डिजिटल टीम

Union Cabinet Meeting Decisions : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बौठकीत आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला चालना देण्यासाठी 3 निर्णय घेण्यात आले. ज्यामध्ये उच्च कार्यक्षमता सोलर पीव्ही मॉड्यूल ट्रान्स-2 साठी PLI योजनेला मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषद दिली.

ते म्हणाले की, उच्च कार्यक्षमता सोलर पीव्ही मॉड्यूल ट्रान्स-2 साठी PLI योजनेसाठी १९,५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 14 भागात पीएलआय योजना आणली जाणार आहे. या योजनेमुळे देशात सौर पॅनेलच्या निर्मितीला चालना मिळणार आहे. याशिवाय बैठकीत मंत्रिमंडळाने सेमीकंडक्टर्स आणि डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टमच्या विकासासाठी कार्यक्रमातील सुधारणांनाही मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली आहे.

या अंतर्गत सेमीकंडक्टर उत्पादन युनिट्सना तंत्रज्ञान नोड्स तसेच संयुक्त सेमीकंडक्टर, पॅकेजिंग आणि इतर सेमीकंडक्टर सुविधांसाठी 50% प्रोत्साहन राशी दिली जाणार आहे. यामुळे 2 लाख लोकांना प्रत्यक्ष आणि 8 लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळण्यास मदत होणार आहे.

नॅशनल लॉजिस्टिक पॉलिसीला मंजूर

या बैठकीत राष्ट्रीय लॉजिस्टिक पॉलिसीलादेखील मंजूरी देण्यात आली असून, ज्याचे नुकतेच 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते. लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स रँकिंग सुधारणे आणि 2030 पर्यंत टॉप 25 देशांमध्ये स्थान मिळवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. याद्वारे, देशभरात उत्पादनांच्या निर्बाध वाहतुकीला प्रोत्साहन देऊन वाहतुकीशी संबंधित खर्चात कपात करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT