PM Modi 
देश

Union Cabinet Meeting: पावसाळी अधिवेशन जुन्या संसदेतच ते मिशन 2047; कॅबिनेट बैठकीत झाली 'या' विषयांवर चर्चा

आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींच्या नेतृत्वाखालील आजची बैठक महत्वाची होती.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आज नवी दिल्लीत पार पडली. यावेळी विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. यामध्ये येणारं पावसाळी अधिवेशन हे जुन्या संसदेतच पार पडेल असं जाहीर करण्यात आलं. तसेच इतर विविध विषयांवरही चर्चा झाल्या आहेत. (Union Cabinet Meeting Discuss many important topics in Presence of PM Modi)

कॅबिनेटच्या बैठकीचा तपशील सांगताना केंद्रीय मंत्री मिनाक्षी लेखी यांनी सांगितलं की, बैठकीत अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा झाल्या. यामध्ये २०४७ व्हिजनवर काम करायचं आहे. जर आज यावर एकत्र येत चांगल्या पद्धतीनं काम केलं तर आपल्या पुढच्या पिढीसाठी २०४७ अवघड जाणार नाही. (Latest Marathi News)

त्याचबरोबर येणार पावसाळी अधिवेशन हे जुन्या संसदेच पार पडेल असंही सांगण्यात आल्याचं लेखी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. त्याचबरोबर सर्व मंत्रालयांना लवकरात लवकर आपली विधेयक मांडण्याच्या सूचनाही पंतप्रधानांनी केल्या आहेत. कारण जसजशी अधिवेशनाची तारीख जवळ येईल तसे विरोधक काम कठीण करतील असंही बैठकीत सांगितलं गेलं आहे. (Marathi Tajya Batmya)

तसेच मोदींच्या अमेरिका दौऱ्यामध्ये नेमकं काय घडलं? कुठल्या गोष्टींवर चर्चा झाल्या या भेटीचा फायदा करुन घेण्यासाठी कशा पद्धतीनं राष्ट्रीय विकासाची नीती आखायची, या मुद्द्यावरही मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याचं मिनाक्षी लेखी यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहने करेक्ट कार्यक्रम केला! बेन स्टोक्स, जो रूटचा चतुराईने उडवला त्रिफळा; वोक्सही OUT

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठीचा आदर राखत अभिनेत्याने जिंकली कानडी मने

Stock Market Closing: शेअर बाजार लाल रंगात; सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद, कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT