eknath shinde and ajit pawar  sakal
देश

Union Cabinet : शिवसेना व ‘राष्ट्रवादी’त नाराजी

अपेक्षित मंत्रिपदे न मिळाल्याने पक्षांतर्गत खदखद.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) घटकपक्षांच्या विश्वासावर उभी असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला असला तरीसुद्धा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांतील नाराजी उघड झाली आहे. या दोन्ही पक्षांचे मिळून आठ खासदार निवडून आलेले असताना त्यांना एकच राज्यमंत्रिपद (स्वतंत्र प्रभार) मिळाले आहे.

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे सात खासदार निवडून आले असून राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच खासदार निवडून आला आहे. या मंत्रिमंडळात शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रिपद व एक राज्यमंत्रिपद तर राष्ट्रवादी काँग्रेसला एक कॅबिनेट मंत्रिपद मिळेल असे वाटत होते.

प्रत्यक्षात सात खासदारांचा पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेच्या प्रताप जाधव यांना राज्यमंत्रिपद (स्वतंत्र प्रभार) मिळाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला तर तेही समाधान मिळू शकलेले नाही. आता त्यामुळे दोन्ही पक्षांत नाराजीचे सूर उमटू लागले आहे. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी याबाबत उघड नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेला कॅबिनेट मंत्रिपद अपेक्षित आहे असे त्यांनी म्हटले आहे.

काही पक्षांना झुकते माप

बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्या ‘हम’ पक्षाचे ते स्वतः एकमेव खासदार म्हणून निवडून आले असले तरी त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आहे. बिहारचे चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाचे ५ खासदार असताना त्यांना कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद मिळाले आहे व दोनच खासदार असलेल्या जयंत चौधरीच्या राष्ट्रीय लोक दलासही एक राज्यमंत्रिपद (स्वतंत्र प्रभार) मिळाले आहे.

शिवसैनिकांनो एकत्र या!

दिल्लीतील महाराष्ट्र सदनच्या बाहेर आज एक पोस्टर लागले असून त्यावर ‘शिवसैनिकांनो एकत्र या!’ असे आवाहन करण्यात आले आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांनी आता एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे यातून सूचित करण्यात आले आहे. या फलकावर कुणाचेही नाव नाही. कोणत्या गटाच्या कार्यकर्त्यांनी हा फलक लावला आहे, याचा त्यावर उल्लेख नसला तरी नाराज असलेल्या शिवसेना खासदाराच्या कार्यकर्त्यांनी हा फलक लावला असेल असे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Darshan: पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार; ऑडिओ क्लिप व्हायरल, अधिक मास सुरू होताच पंढरपुरात खळबळ..

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

SCROLL FOR NEXT