Top Ten Ministers sakal
देश

Union Cabinet : वरिष्ठ मंत्र्यांची खाती कायम; शिवराजसिंह यांच्याकडे कृषी, नड्डा आरोग्यमंत्री

मंत्रिमंडळ स्थापनेनंतर खातेवाटप करताना पंतप्रधान मोदींनी अणुऊर्जा, कार्मिक, अवकाश संशोधन, धोरणात्मक निर्णय ही खाती पूर्वीप्रमाणेच स्वतःकडे ठेवली आहे.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर तब्बल २४ तासांनी खातेवाटप जाहीर झाले असून संरक्षण, गृह, अर्थ आणि परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी अनुक्रमे राजनाथसिंह, अमित शहा, निर्मला सीतारामन आणि एस. जयशंकर यांच्याकडे कायम ठेवताना या प्रमुख मंत्रालयांमधील सरकारच्या धोरणात आणि निर्णय प्रक्रियेत काहीही बदल होणार नसल्याचे स्पष्ट संकेत पंतप्रधानांनी दिले आहेत. तर, सरकारमधील प्रभावी चेहरा असलेले मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा रस्ते वाहतूक आणि महामार्ग खाते मिळाले आहे.

मंत्रिमंडळ स्थापनेनंतर खातेवाटप करताना पंतप्रधान मोदींनी अणुऊर्जा, कार्मिक, अवकाश संशोधन, धोरणात्मक निर्णय ही खाती पूर्वीप्रमाणेच स्वतःकडे ठेवली आहे. तर, मागील सरकारमधील बहुतांश मंत्र्यांकडे पूर्वीचीच खाती कायम ठेवताना मंत्रालयांची जबाबदारी देताना ‘एनडीए’तील तेलुगू देसम पक्ष, संयुक्त जनता दल या पक्षांचा कोणताही दबाव नसल्याचेही दर्शविले आहे.

सत्तास्थापनेसाठी भाजपला पाठिंबा देण्याच्या बदल्यात रेल्वे, गृह यासारख्या खात्यांची मागणी तेलुगू देसम पक्ष, संयुक्त जनता दल या घटक पक्षांनी केल्याची चर्चा होती. मात्र, खातेवाटप पाहता, हे पक्ष मिळालेल्या खात्यांवर राजी झाल्याचे दिसते.

तेलुगू देसम पक्षाचे मंत्री राममोहन नायडू यांना नागरी विमान वाहतूक मंत्रालय, संयुक्त जनता दलाचे नेते राजीव रंजन सिंह ऊर्फ लल्लन सिंह यांना पंचायती राज आणि पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्रालय सोपविण्यात आले आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांना पोलाद आणि अवजड उद्योग मंत्रालय, तर लोकजनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांना अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालय देण्यात आले आहे.

मागील सरकारमधील शिक्षण खात्याचे मंत्रिपद सांभाळणारे धर्मेंद्र प्रधान यांना नव्या सरकारमध्ये देखील पुन्हा शिक्षण हेच खाते मिळाले आहे. तर अश्विनी वैष्णव यांचे महत्त्व वाढले आहे. त्यांच्याकडे रेल्वे मंत्रालय कायम ठेवताना माहिती व प्रसारण मंत्रालय सोपवून शासकीय प्रचाराची जबाबदारीही देण्यात आली आहे. मागील सरकारमध्ये त्यांच्याकडे रेल्वे सोबतच दूरसंचार मंत्रालय होते.

नड्डांकडे आरोग्यमंत्रालय

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना महत्त्वाचे कृषी खाते मिळाले आहे. तर हरियानाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना नगरविकास आणि ऊर्जा खाते देण्यात आले आहे. या महिनाअखेरीस भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची मुदत संपुष्टात येत असलेले जे. पी. नड्डा यांच्याकडे आरोग्य मंत्रालय देण्यात आले आहे. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात नड्डा यांच्याकडे आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी होती. पंतप्रधान मोदींचे गुजरातमधील विश्वासू मानले जाणारे सी. आर. पाटील यांना जलशक्ती खाते मिळाले आहे.

संसदेतील महत्त्वाचे मानले जाणारे संसदीय कामकाज खाते यावेळी किरेन रिजीजू यांना मिळाले आहे. तर आधीच्या सरकारमधील संसदीय कार्यमंत्री राहिलेले प्रल्हाद जोशी यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खाते दिले आहे.

जाधवांना ‘आयुष’, तर मोहोळांना ‘सहकार’

मंत्रिमंडळात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा रस्ते आणि परिवहन मंत्रालय मिळाले आहे. तर पियुष गोयल यांच्याकडे देखील पूर्वीप्रमाणेच वाणिज्य व उद्योग खाते आले आहे. स्वतंत्र कार्यभार मिळालेले शिवसेनेचे राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना आयुष मंत्रालय तसेच आरोग्य खात्याच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी मिळाली आहे.

तर, रामदास आठवले यांना पूर्वीप्रमाणेच पुन्हा एकदा सामाजिक न्याय मंत्रालयाचे राज्यमंत्रिपद मिळाले आहे. पहिल्याच फटक्यात खासदारकी सोबत राज्यमंत्रिपदाची संधी मिळालेले पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना सहकार आणि नागरी विमान वाहतूक खात्याचे काम सोपविण्यात आले आहे.

मुरलीधर मोहोळ हे सहकार मंत्री अमित शाह यांच्या हाताखाली काम करतील. यासोबतच, महाराष्ट्रातील आणखी एक राज्यमंत्री रक्षा खडसे यांना क्रीडा आणि युवक कल्याण कल्याण खात्याची जबाबदारी मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT