Bharat daal 
देश

Bharat Dal : महागाई नियंत्रणासाठी मोठा निर्णय! केंद्रीय अन्नमंत्र्यांनी लाँच केली 'भारत दल'; किंमत...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली: केंद्रीय ग्राहक, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी अनुदानित चनाडाळीच्या विक्रीचा शुभारंभ केला. 'भारत दाल' या ब्रँड नावाखाली अनुदानित चनाडाळीच्या एका किलोच्या पॅकची किंमत ६० रुपये प्रति किलो असेल, तर चनाडाळीच्या ३० किलोच्या पॅकची किंमत ५५ रुपये प्रति किलो निश्चित करण्यात आली आहे.

अनुदानित चणाडाळ दिल्ली-एनसीआर प्रदेशातील राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघाच्या (NAFED) किरकोळ दुकानांवर विकली जात आहे. या नवीन उपक्रमाद्वारे शासनाच्या हरभरा साठ्याचे हरभरा डाळीत रूपांतर करून या डाळी सर्वसामान्य ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

अन्न मंत्रालयाने जारी केलेल्या नोटनुसार, चणाडाळीचे दळण आणि पॅकेजिंग नॅशनल अॅग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (NAFED) द्वारे स्वतःच्या रिटेल आउटलेट NCCF, केंद्रीय भंडार आणि सफालच्या आउटलेटद्वारे वितरणासाठी केले जाईल.

चणाडाळ राज्य सरकारांना त्यांच्या कल्याणकारी योजना, पोलीस, तुरुंग आणि त्यांच्या ग्राहक सहकारी दुकानांमधून वितरणासाठी उपलब्ध करून दिली जाते. चणाडाळ ही भारतातील सर्वात मोठ्या प्रमाणात उत्पादित करण्यात येत असलेली डाळ आहे. या डाळीचा वापर भारतभर विविध प्रकारे केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT