vaccine for child 
देश

ऑगस्टमध्ये लहानग्यांसाठी उपलब्ध होणार लस; आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

विनायक होगाडे

नवी दिल्ली : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत संशोधकांनी गंभीर इशारा दिला आहे. तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसू शकतो, अशी चेतावनी अनेक तज्ज्ञांनी दिली आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवरच एक महत्त्वाची बातमी सध्या समोर येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी अशी माहिती दिली आहे की, ऑगस्ट महिन्यामध्ये लहान मुलांना दिली जाणारी कोरोना लस भारतामध्ये येऊ शकते. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी ही माहिती मंगळवारी झालेल्या भाजपा संसदीय पक्षाच्या बैठकीत दिली आहे.या बैठकीत मांडवीय यांनी म्हटलंय की, सरकार पुढच्या महिन्यात लहान मुलांसाठी कोरोनाची लस देण्यास सुरु करेल. त्यांनी अशी देखील माहिती दिलीय की, भारत लवकरच सर्वांत मोठा लस उत्पादक देश बनेल कारण अधिकाधिक कंपन्यांना लशीच्या उत्पादनाचं लायसन्स मिळणार आहे.

शाळा उघडण्यास होईल फायदा

देशात आतापर्यंत जेवढ्या कोरोना लस दिल्या जात आहेत, त्या केवळ 18 वर्षे वयावरील लोकांनाच दिली जात आहे. तर आता 18 वर्षे वयाखालील मुलांना कोरोनाची लस देण्याबाबत तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, यामुळे संक्रमणाची चैन तोडणं सोपं होईल. लहान मुलांना लस दिली गेल्यास शाळा उघडण्याच्या दिशेने देखील ठोस विचार करता येईल.

एम्सच्या प्रमुखांचंही सुचक वक्तव्य

लहान मुलांसाठीची लस सप्टेंबर महिन्यापर्यंत येईल, असं मत एम्सचे प्रमुख रणदीप गुलेरिया यांनी मांडलं आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वीच असं मत मांडलं होतं की, देशात सप्टेंबर महिन्यापर्यंत लहान मुलांना कोरोनाची लस देण्यास सुरुवात होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT