terrorist google
देश

पुलवामा हल्ल्यात सहभागी जौशचा कमांडर दहशवादी घोषित

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या घुसखोरीमध्येही त्याचा हात असल्याचे सांगण्यात आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यात सहभाग असणाऱ्या जैश-ए-मोहम्मद (JeM) या प्रतिबंधित संघटनेच्या कमांडर आशिक अहमद नेंगरूला भारत सरकारकडून दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. नेंगरूचा जम्मू-काश्मीरमधील विविध दहशतवादी घटनांमध्ये हात असल्याचा आरोप आहे. नेंगरू भारताच्या सुरक्षेदृष्टीने धोकादायक बनला असून, याच पार्शभूमीवर त्याला दहशतवादी प्रतिबंध कायदा, 1967 (1967 चा 37) च्या तरतुदींनुसार दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आल्याचे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (India Declared Jaish e Mohammad Commander As A Terrorist)

केंद्रीय गृह मंत्रालयाने सोमवारी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आशिक अहमद नेंगरूजैश-ए-मोहम्मदचा एक क्रूर दहशतवादी असून, जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या घुसखोरीमध्येही त्याचा हात असल्याचे सांगण्यात आले आहे. यासोबतच केंद्रशासित प्रदेशात विविध दहशतवादी घटना घडवून आणण्यातही आशिक अहमद नेंगरूचा हात होता. याशिवाय नेंगरू काश्मीरमध्ये दहशतवादी सिंडिकेट चालवत असून, त्याचा जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवण्याच्या मोहिमेतही सहभाग असल्याने मंत्रालयाने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT