देश

"ठाकरे सरकार कलंकित, त्यांना सत्तेवर राहण्याचा आधिकार नाही" 

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबईत मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर पोलिसानेच स्फोटके ठेवणे, कँबिनेट मंत्र्यांने शंभर कोटी रुपये वसुलीचे टार्गेट पोलिसांना देणे यामुळे उद्धव ठाकरे सरकार कलंकित झाले आहे. त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. त्यांचे सरकार बरखास्त करावे, अशी मागणी रिपाईंचे अध्यक्ष, खासदार रामदास आठवले यांनी राष्ट्रपतींकडे केली आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची आठवले यांनी आज भेट घेतली. महाराष्ट्रात अराजक असल्याची टीका करीत त्यांनी यावेळी राज्यात  राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. यी भेटीनंतर आठवले यांनी नवीन महाराष्ट्र सदनामध्ये पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे सरकारवर टीका केली. कोरोनाचे प्रसार रोखण्यातही सरकार अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली.

पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. परंतु त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना त्यांना पाठिशी घालत आहे. मात्र अनिल देशमुख हे त्यांच्यावरील आरोपांच्या चौकशी मागणी करीत असूनही कार्यवाही केली जात नाहीत. त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही? हे प्रकरण गंभीर असून यात मोठ्या व्यक्तीचा हात आहे. या प्रकरणामुळे महाराष्ट्राची राष्ट्रीय स्तरावर बदनामी झाली आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्था राहिलेली नाही. म्हणून हे सरकार बरखास्त केले पाहिजे, असे आठवले म्हणाले.

पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंग केल्याच्या मुद्द्यावर बोलतना आठवले म्हणाले, "यांनी हे प्रकार योग्य नाहीत.   परंतु एखादा व्यक्ती वा राजकारण्याचा एखाद्या प्रकरणाशी संबंध असेल, तर पोलिसांना फोन टॅपिंग करण्याचा अधिकार आहे. अनावश्यक फोन टॅपिंग झावे असेल, तर त्याची चौकशी झाली पाहिजे, असे आठवले यांनी स्पष्ट केले. संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार‌ यांच्याकडे देण्याची चर्चा सुरू आहे. यावर रामदास आठवले म्हणाले, " यूपीएने त्याबाबत निर्णय घेतला पाहिजे. पण शरद पवार यांच्याकडे अध्यक्ष देण्यास काँग्रेसच्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी पाठिंबा देतील, असे वाटत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT