Ashwini Kumar Choubey esakal
देश

Accident News : केंद्रीय मंत्र्याच्या ताफ्यातील गाडीचा अपघात; चार पोलिसांसह 5 जण जखमी

या घटनेची माहिती खुद्द केंद्रीय मंत्र्यांनी ट्विट करून दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे (Ashwini Kumar Choubey) यांच्या ताफ्यात सामील असलेल्या पोलिस वाहनाला रविवारी रात्री अपघात झाला. या अपघातात चार पोलिस (Police) आणि चालकासह पाच जण जखमी झाले आहेत.

या सर्वांवर डुमराव उपविभागीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. केंद्रीय मंत्री स्वत: सर्व जखमींना घेऊन रुग्णालयात पोहोचले आणि रात्री उशिरापर्यंत तिथंच थांबले. बक्सरहून पाटण्याकडं परतत असताना मथिला-नारायणपूर मार्गावरील डुमरावनजीक कोरानसराई पोलिस ठाण्याचं वाहन शेतात उलटलं. त्याच्या शेजारीच चालणाऱ्या इनोव्हा कारमध्ये केंद्रीय मंत्री बसले होते. जखमींपैकी दोघांना गंभीर दुखापत झालीये.

या घटनेची माहिती खुद्द केंद्रीय मंत्र्यांनी ट्विट करून दिलीये. त्यांनी अपघाताचा व्हिडिओ ट्विट करून सांगितलं की, बक्सरहून पाटण्याला जात असताना डुमरावच्या मथिला-नारायणपूर रस्त्यावर धावणाऱ्या पोलिसांच्या वाहनाला अपघात झाला. दोन पोलिसही जखमी झाल्याचं त्यांनी सांगितलं.

मंत्री पुढं म्हणाले, 'आपण स्वतः सर्व जखमींना डुमराव रुग्णालयात नेलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.' नुकतंच बिहारमधील बक्सरमध्ये काही आंदोलकांनी केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांच्या ताफ्याला रोखून घोषणाबाजी केली. त्यांची गाडी पाहून आंदोलकांनी घेराव घातला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले ब्रिजवरील वाहतूक ३ तासांनी सुरू; कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर, आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai Indians Playoff Scenario: मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात? आता काही केलं तरी प्ले ऑफमध्ये पोहोचणे अशक्य; हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर सवाल, CSK चं काय?

How Mumbai Indians Still Qualify for Playoff? हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ नेमका कुठे कुठे चुकला? मुंबई इंडियन्सला १४ गुणांसह अव्वल चार मध्ये पोहोचता येईल का?

Dhamangaon Blaze: नागपूरमधील धामणगाव विद्यामंदिर गावात भीषण आग, ३०-४० घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान

गोव्यात दारू प्यायल्यावर जास्त नशा का चढत नाही? ९९ टक्के लोकांना खरं कारण माहित नाही...

SCROLL FOR NEXT