harshwardhan
harshwardhan 
देश

केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले,'काळजी करण्याची गरज नाही, लवकरच होणार एक कोटी...'

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दररोज 15 हजारांहून अधिक रुग्ण सापडत असून शेकडो लोकांचा मृत्यू होत आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी सांगितलं की, लोकांनी काळजी करण्याची गरज नाही. लवकरच देशात एक कोटी कोरोना टेस्टिंगचा आकडा पूर्ण होईल. हर्षवर्धन यांनी गुरुवारी म्हटलं की, आतापर्यंत 91 लाख लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. काही दिवसात देशात कोरोनाच्या चाचण्यांची संख्या एक कोटींवर पोहोचेल. 

आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन म्हणाले की, आकडेवारीवरून स्पष्ट होतं की भारताने कोरोना व्हायरसविरोधात जोरदार लढा दिला आहे आणि त्यात यशही मिळवलं आहे. लोकांनी काळजी करायची गरज नाही. 135 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या सहा लाख आहे. यातील 3 लाख 60 हजार लोक बरे होऊन घरी परतले आहेत. भारतात रिकव्हरी रेट 60 टक्के इतका आहे. 21 ते 22 दिवसांत हा दर दुप्पट होत आहे. तर दुसरीकडे भारतात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणही जगात सर्वात कमी 2.94 टक्के इतकं आहे. 

डॉक्टर हर्षवर्धन म्हणाले  की, भारतात इतक्या मोठ्या प्रमाणावर कोरोनाच्या चाचण्या घेतल्या जात आहेत की बुधवारी देशात 30 हजार चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांची सुरुवात एका लॅबमध्ये झाली होती. सध्या देसात 1 हजार 65 लॅब तयार करण्यात आल्या आहेत. देशात 118 लाख पीपीई कीट आणि 195 लाख एन 95 मास्क वितरीत कऱण्यात आले आहेत. पहिल्या दिवसापासून आपली व्यवस्था मजबूत करण्यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली होती. अद्याप त्याचा पूर्ण वापर झालेला नाही असंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. 

जगभरात कोरोनाचे आतापर्यंत एक कोटींहून अधिक रुग्ण आढळले आहेत. यापैकी पाच लाखांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. भारतातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या सहा लाखांच्या पुढे गेली असून आतापर्यंत 3 लाख 60 हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर देशात आतापर्यंत कोरोनामुळे 17 हजार 834 जणांचा मृत्यू झाला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Constitution : '...तर मोदी सरकारने केव्हाच देशाचे संविधान बदलले असते'

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

SCROLL FOR NEXT