harsimrat kaur badal- 
देश

मोदी सरकारला झटका; कृषी विधेयकाच्या विरोधात केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- सरकारच्या कृषी विधेयकाबाबत केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये मतभेद दिसून येत आहेत. एनडीएमधील  शिरोमणी अकाली दलाच्या मंत्री हरसिमरत कौर बादल (Harsimrat Kaur Badal)यांनी कृषी विधेयकाच्या विरोधात राजीनामा दिला आहे. शेतकऱ्यासंबंधी करण्यात आलेल्या तीन विधेयकांबाबत पंजाबच्या शेतकऱ्यांमध्ये अंसतोष वाढत आहे. अकाली दलाने या प्रकरणी आपल्या खासदारांना व्हिप जारी केला आहे. संसदेत या विधेयकाविरोधात मतदान करण्यास सांगितलं आहे.

कृषीविषयक तीन विधेयकांना भाजपचा घटक पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाने कडाडून विरोध केला आहे. "ते (भाजप) काहीही सांगतील व आम्ही ते मान्य करू, असे होणार नाही,' अशा शब्दांत अकाली दलाचे नेते व राज्यसभा खासदार बलविंदरसिंग भुल्लर यांनी संताप व्यक्त केला होता.

केंद्राने जीवनावश्‍यक वस्तू कायदादुरूस्ती, व्यापार व वाणिज्य (संवर्धन- सुविधा) व शेतकरी करार -सशक्तीकरण व संरक्षण (कंत्राटी शेती) ही विधेयके संसदेत मांडण्यासाठी सज्ज ठेवली आहेत. ही विधेयके शेतकऱ्यांच्या हिताची असून याआधी कॉंग्रेसने तिन्ही अध्यादेशांना जाहीर पाठिंबा दिला होता, असा दावा भाजपने केला आहे. मात्र या विधेयकांना देशभरातील शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध होत आहे. शेतकऱ्यांच्या विरोधाची धग आता सत्तारूढ आघाडीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली असून या कृषी विधेयकांना अकाली दलानेच विरोध केला आहे.

धक्कादायक! कोरोनाचे अर्ध्याहून जास्त डोस श्रीमंत देशांनी केलेत बुक

लोकसभा व राज्यसभेतील अकाली दलाचे संख्याबळ पहाता त्यांच्या विरोधाचा विधेयकांच्या मंजुरीत अडथळा येण्याची शक्‍यता नसली तरी अकाली दल हा सर्वांत जुना पक्ष दुखावला गेल्याने भाजप नेतृत्वाला त्यांची मनधरणी करणे क्रमप्राप्त आहे.

भुल्लर म्हणाले, की आमचा पक्ष स्वतंत्र आहे. आमचा अजेंडा वेगळा व त्यांचा अजेंडा वेगळा आहे. आमची भाजपबरोबर युती आहे याचा हा अर्थ नाही की त्यांनी काहीही सांगितले की आम्ही मान्य करायचे. हे चालणार नाही. ही कृषी विधेयके शेतकऱ्यांवर प्रचंड अन्याय करणारी असल्याची शेतकऱ्यांची भावना झालेली असून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होऊ नये यासाठी संसदेत याला तीव्र विरोध करू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT