Minister Kaushal Kishore On Jawahar Lal Nehru esakal
देश

Jawaharlal Nehru : जवाहरलाल नेहरूंना 'हे' व्यसन होतं; केंद्रीय मंत्र्याचं वादग्रस्त विधान, महात्मा गांधींवरही निशाणा

केंद्रीय मंत्र्यानं माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलंय.

सकाळ डिजिटल टीम

केंद्रीय मंत्र्यानं माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलंय.

Minister Kaushal Kishore On Jawahar Lal Nehru : अंमली पदार्थांविरोधात मोहीम राबवणारे केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलंय.

राजस्थानमधील भरतपूरमध्ये माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री म्हणाले, जवाहरलाल नेहरू सिगारेट ओढायचे. याशिवाय त्यांनी महात्मा गांधींचा मुलगा दारूच्या नशेत असायचा, असंही म्हटलं. केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर भरतपूरला आले होते. इथं त्यांनी नशा मुक्ती जागरण अभियान कार्यक्रमात भाग घेतला होता. यावेळी त्यांनी सांगितलं की, 'जवाहरलाल नेहरू ड्रग्ज घेत असत, सिगारेटही ते ओढायचे.'

Minister Kaushal Kishore On Jawahar Lal Nehru

अमली पदार्थांविरोधात मोहीम राबवत असताना केंद्रीय मंत्री देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन लोकांना जागरूक करण्याचं काम करत आहेत. याअंतर्गत ते भरतपूरला पोहोचले होते, तिथं त्यांनी नेहरू आणि गांधीजींवर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांनी भाषणात पुढं म्हटलंय की, 'अशा प्रकारे अमली पदार्थांच्या जगानं आपल्या देशाला पूर्णपणे काबीज केलंय. आम्ही सर्वांना आवाहन करतो की, ड्रग्समुळं होणाऱ्या सर्व प्रकारच्या हानी आणि मृत्यूबद्दल लोकांना माहिती द्यावी.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Solapur Highway Traffic : पुणे-सोलापूर महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी, वाहनांच्या ६ किलोमीटरपर्यंत रांगा; प्रवाशांचे प्रचंड हाल

Latest Marathi News Live Update : उन्हाळी सुटीनंतर राज्यातील ज्ञानमंदिरे आजपासून पुन्हा गजबजणार; चिमुकल्यांना पहिल्या दिवसाची उत्सुकता

Fifa World Cup 2026 : लोकसंख्या डोंबिवलीपेक्षाही कमी, पण जिद्द हिमालयाएवढी! 'हा' चिमुकला देश वर्ल्ड चॅम्पियन जर्मनीला नडला

Solapur: अंनिसच्या प्रयत्नांना यश: अंधश्रद्धेच्या विळख्यातून सुटका करत महिलेची 'जटा' केली मुक्त!

Sangli Satara Election: विधान परिषद निवडणुकीत मोठी रणनीती! भाजपचे सदस्य अज्ञातस्थळी हलवणार, क्रॉस वोटिंगची धास्ती?,सांगली-सातारा विधान परिषद लढतीत ट्विस्ट

SCROLL FOR NEXT