Nitin Gadkari esakal
देश

Nitin Gadkari: ...अन् नितिन गडकरींनी केले मनमोहन सिंग यांचे कौतुक

सकाळ डिजिटल टीम

देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे कौतुक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तोंडभरुन कौतुक केले. भारत मनमोहन सिंग यांचा ऋणी आहे. अशा शब्दात गडकरी यांनी स्तुतीसुमने उधळली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. (Union Minister Nitin Gadkari Praised Manmohan Singh )

मनमोहन सिंग यांनी घेतलेल्या आर्थिक सुधारणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळाली. आर्थिक सुधारणांसाठी देश माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा ऋणी आहे, असे नितीन गडकरी एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले.

टॅक्स इंडिया ऑनलाइन पोर्टल अवॉर्ड कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. यावेळी, मनमोहन सिंग यांनी 1991 मध्ये अर्थमंत्री म्हणून आर्थिक सुधारणा सुरू करून भारताला नवी दिशा दिली होती. यामुळे देशात उदारमतवादी अर्थव्यवस्थेची सुरुवात झाली, असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

तसेच, 'लिबरल अर्थव्यवस्थेमुळे देशाला नवी दिशा मिळाली, त्यासाठी मनमोहन सिंग यांचा देश ऋणी आहे. अशी भावना व्यक्त करत गडकरी यांनी स्तुतीसुमने उधळली.

माजी पंतप्रधान सिंग यांनी सुरू केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे 1990 च्या दशकात मी महाराष्ट्रात मंत्री असताना रस्ता बांधण्यासाठी निधी उभारता आला होता, अशी आठवणही नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran political Crisis: इराणमध्ये संघर्षाचा पेच कायम; नेत्यांना मारण्याचे विपरित परिणाम होण्याचा इशारा!

Latest Marathi News Live Update : पादुका दर्शनासाठी सज्ज होतोय 'भक्तीचा महाकुंभ'; वरळीच्या NSCI डोममध्ये उद्यापासून उत्सवाला होणार सुरुवात

MP EOW Controversy : एक वर्षाच्या बालकावर बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा गुन्हा, आर्थिक गुन्हे शाखेचा पराक्रम

Chhatrapati Sambhajinagar News: अवकाळी पावसाचा मोठा फटका; हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

PM Kisan 22nd Installment : 'पीएम किसान'चे 93 कोटी खात्यात जमा झाले, पण 'या' चुकीमुळे 11 हजार शेतकऱ्यांचे पैसे अडकले; त्वरित करा हे काम!

SCROLL FOR NEXT