Ramdas Athawale vs Rahul Gandhi  esakal
देश

Ramdas Athawale : सोनियांनीच राहुल गांधींना पंतप्रधान होऊ दिलं नाही; रामदास आठवलेंचा मोठा गौप्यस्फोट

'2024 मध्ये NDA 400 च्या वर जागा जिंकत असेल तर राहुल पंतप्रधान कसे होतील?'

सकाळ डिजिटल टीम

'2024 मध्ये NDA 400 च्या वर जागा जिंकत असेल तर राहुल पंतप्रधान कसे होतील?'

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना देशाचा पंतप्रधान होण्याची संधी कधीच मिळणार नाही, असं रामदास आठवले यांनी म्हटलंय. 2004 मध्ये संधी मिळाली तेव्हा सोनिया गांधी आणि काँग्रेस पक्षानं (Congress) त्यांना पंतप्रधान होऊ दिलं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) पुढं म्हणाले, आता वेळ निघून गेलीये. आता त्यांना ही संधी कधीच मिळणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा ताफा वेगानं पुढं जात आहे. त्यांची जागा राहुल गांधी घेऊ शकणार नाहीत. 2024 मध्ये NDA 400 च्या वर जागा जिंकत असेल तर राहुल पंतप्रधान कसे होतील? असा सवाल त्यांनी केलाय.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) काँग्रेसला 40 पेक्षा जास्त जागा मिळणार नसल्याचंही आठवलेंनी म्हटलंय. यावेळी आठवलेंनी राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला. दरम्यान, काँग्रेस नेते पवन खेरा यांनी राहुल गांधी 2024 मध्ये देशाचे पंतप्रधान होतील, असं म्हटलं होतं.

भारत जोडो यात्रा काल (शनिवार) दिल्लीत पोहोचलीये. 7 सप्टेंबरला कन्याकुमारीतून सुरू झालेली ही पदयात्रा आतापर्यंत तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यांतून प्रवेश केलीये. भारत जोडो यात्रेचं शनिवारी दिल्लीत आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT