देश विरोधकांना प्रत्युत्तर देत आहे: प्रसाद
देश विरोधकांना प्रत्युत्तर देत आहे: प्रसाद 
देश

प्रीतम मुंडेंची केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांनी केले कौतुक

सकाळ डिजिटल टीम

गोपीनाथ मुंडे यांनी तळागाळातील लोकांपर्यंत भाजपला पोहोचवले. अनेक जिल्ह्यात पक्षाचे कार्यकर्ते नव्हते. मुंडे व प्रमोद महाजन यांनी कार्यकर्ते तयार केले.

नवी दिल्ली - प्रीतम मुंडे (MP Pritam Munde) या चांगल्या संसद सदस्य म्हणून पुढे येत आहेत, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद (Union Minister Ravishankar Prashad) यांनी गौरवोद्गार काढले. आज गुरुवारी (ता.तीन) गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष पोस्टल लिफाफ्याचे विमोचन कार्यक्रम ऑनलाईनपद्धतीने पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. श्री.प्रसाद म्हणाले, की लोकसभेत गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) गरिबांविषयी प्रश्न उपस्थित करित होते. त्यांना केंद्रीय कृषीमंत्री म्हणून केवळ एकच महिना मिळाला. आमच्या पोस्ट विभागाने महत्त्वाचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ पोस्टल लिफाफ्याचे विमोचन करत आहे, हे भाग्य असल्याचे श्री.प्रसाद म्हणाले. २०१४ मध्ये जेव्हा मंत्री झालो तेव्हा मोदी म्हणाले, की रविशंकर पोस्टमनची चिंता कर, असा सल्ला मोदींनी दिल्याची आठवण त्यांनी यावेळी सांगितली. (Union Minister Ravishankar Prasad Appreciate Pritam Munde's Work)

तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवला भाजपला

केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे (Union Minister For State Sanjay Dhotre) म्हणाले, की गोपीनाथ मुंडे यांनी तळागाळातील लोकांपर्यंत भाजपला पोहोचवले. अनेक जिल्ह्यात पक्षाचे कार्यकर्ते नव्हते. मुंडे व प्रमोद महाजन यांनी कार्यकर्ते तयार केले. नेतृत्व घडवणारे अचानक आम्हाला सोडून गेले. पण त्यांनी निर्माण केलेले विचार, कार्यकर्ते यामुळे प्रत्येक वर्गात, गावात भाजप पोहोचला आहे. महाराष्ट्रात त्यांनी भाजपला दिशी दिली, असे श्री.धोत्रे यांनी सांगितले.

Ashok Gavhane Write about Gopinath munde and his Contribution to the field of cooperation

वंचितांचा आवाज

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (BJP National President JP Nadda) या प्रसंगी म्हणाले, की गोपीनाथ मुंडे हे गरीब, दलित व वंचितांचा राष्ट्रीय आवाज होता. ते केवळ बहुजनांचे नेते नव्हते ते सर्वांचे नेते होते. मुंडे हे नवीन विचारांचे धनी होते. गरीब, शेतकरी वंचित यांच्या पीडाशी स्वतःला जोडून घेत होते. ती कमी करण्यासाठी ते काम करत होते. त्यांना विनम्र आदरांजली अर्पण करतो. करोडो कार्यकर्त्यांनी गोपीनाथ मुंडेंकडून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन नड्डा यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT