Nisith Pramanik Sakal
देश

Video : केंद्रीय मंत्री निसिथ प्रामाणिका यांच्या ताफ्यावर दगडफेक; पोलिसांकडून अश्रूधुराचा वापर

निसिथ पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी निघाले होते.

सकाळ डिजिटल टीम

Nisith Pramanik : केंद्रीय मंत्री निसिथ प्रामाणिकांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

पश्चिम बंगालच्या कूचबिहारच्या दिनहाटा भागात ही घटना घडली असून, निसिथ पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी निघाले होते. त्यावेळी हा हल्ला करण्यात आला आहे. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत.

स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रामाणिक यांचा शनिवारी दिनहाटाच्या बुरीरहाट भागात कार्यक्रम होता. या कार्यक्रमावेळी टीएमसी कार्यकर्त्यांकडून निसिथ यांना काळे झेंडे दाखवत निषेध करण्यात येणार होता.

प्रामाणिक यांच्या या दौऱ्यासाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. मात्र, निसिथ दाखल झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला. यावेळी ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. हा हल्ला तृणमूलच्या समर्थकांनी केल्याचा आरोप प्रामाणिक यांनी केला आहे.

जर एखादा मंत्री सुरक्षित नसेल, तर तुम्ही सामान्य माणसाच्या दुरवस्थेची कल्पना करू शकता. ही घटना बंगालमधील लोकशाहीची स्थिती दर्शवते, असे म्हणत हा हल्ला तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांनी केल्याचा आरोप प्रामाणिक यांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्र्याच्या घराला टीएमसी समर्थकांनी घेराव घातला होता. यावरून कूचबिहारमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर आज केंद्रीय मंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bankipur Election Result 2026 : भाजपाला मोठा धक्का! ३० वर्षांचा गड ढासळला; बांकीपूर पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा दणदणीत विजय

Dimbhe Dam : डिंभे धरणाचा विसर्ग वाढला; लाखणगावचा पूल पाण्याखाली, बेल्हे-जेजुरी महामार्गावरील वाहतूक ठप्प

Latest Marathi News Live Update : ''गुन्हेगाराला मुख्यमंत्री बनवलं तर....''; बांकीपूरच्या निकालावर काय म्हणाले प्रशांत किशोर?

'पूर्ण सिस्टमच त्याला वाचवतेय...'; बृजभूषण यांच्या निर्दोष सुटकेनंतर Vinesh Phogat काय म्हणाली? मोठं पाऊल उचलण्याचा इशारा

Temple Development : डोंगरगाव शिवच्या तोंडेश्वर महादेव मंदिराला तीर्थक्षेत्र 'ब' वर्गाचा दर्जा; आमदार अनुराधा चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

SCROLL FOR NEXT