Union Ministry of Home Affairs approved Gujarat and Himachal Pradesh as financial assistance for 
देश

गुजरात-हिमाचल प्रदेशसाठी मोठा दिलासा; नैसर्गिक आपत्तीतून सावरण्यासाठी केंद्राची आर्थिक मदत जाहीर

नैसर्गिक आपत्तीने ओढावलेल्या संकटासाठी गृह मंत्रालयाने मदतीची घोषणा केली आहे. गुजरातसाठी ३३८ कोटी रुपये तर हिमाचल प्रदेशासाठी ६३३ कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- नैसर्गिक आपत्तीने ओढावलेल्या संकटासाठी गृह मंत्रालयाने मदतीची घोषणा केली आहे. गुजरातसाठी ३३८ कोटी रुपये तर हिमाचल प्रदेशासाठी ६३३ कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. (Union Ministry of Home Affairs approved Gujarat and Himachal Pradesh as financial assistance for damages caused by natural calamities)

केंद्रीय गृहमंत्रालयाने 'एक्स'वर पोस्ट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. गुजरातमध्ये बिपरजॉय वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. यासाठी ३३८.२४ कोटी आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य आणि केंद्राने आपत्तीपूर्व खबरदारी घेतली होती. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीवेळी शून्य जीवितहानी झालीये, असं पोस्टमध्ये म्हणण्यात आलंय.

हिमाचल प्रदेशसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून ६३३.७३ कोटी रुपये देण्यात येत आहेत. राज्यात यावर्षी मान्सूनदरम्यान पूर, ढगफूटी, जमीन खचणे अशा आपत्तींना सामना करावा लागला आहे. यासाठी आर्थिक मदत जाहीर करण्यात येत असल्याचं गृह मत्रालयाकडून सांगण्यात आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT