देश

Odisha Train Accident: बेपत्ता लोकांबद्दल बोलताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना रडू कोसळले, Video

भीषण रेल्वे अपघातानंतर देशभरात शोककळा पसरली आहे.

धनश्री ओतारी

ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर देशभरात शोककळा पसरली आहे. या अपघातात असंख्य लोकांनी आपले जवळचे नातेवाईक गमावले आहेत. दरम्यान, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा भावनिक व्हिडीओ समोर आला आहे. बेपत्ता लोकांबद्दल बोलताना त्यांना अश्रु अनावर झाले.

बालासोर रेल्वे अपघात स्थळावरील रेल्वे ट्रॅकचे काम पुर्ण झाले आहे. आता दोन्ही बाजूंनी (UP-DOWN) रेल्वे वाहतुकीसाठी मार्ग मोकळा झाला आहे. एका बाजूचे काम एका दिवसात पूर्ण झाले, आता दुसऱ्या जागेचे कामही पूर्ण झाले आहे.

यानंतर रेल्वे अपघातातील बेपत्ता लोकांचा उल्लेख करताना ते भावुक झाले. रुळावर मार्ग मोकळा झाला आहे, मात्र आमची जबाबदारी अद्याप संपली नाही. असे रेल्वेमंत्री यावेळी म्हणाले.(Latest Marathi News)

अद्याप जबाबदारी संपलेली नाही

माध्यमांशी बोलताना अश्विनी वैष्णव यांना अश्रु अनावर झाले. 'बेपत्ता लोकांच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर त्यांच्या कुटुंबीयांना भेटता यावे, हा आमचा उद्देश आहे. ते लवकरात लवकर मिळावेत. आमची जबाबदारी अजून संपलेली नाही." (Latest Marathi News)

ज्या बालासोरमध्ये रेल्वे अपघात झाला, तेथे युद्धपातळीवर काम चोवीस तास सुरू होते. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव घटनास्थळी सतत उपस्थित होते. शेकडो रेल्वे कर्मचारी, बचावकार्य कर्मचारी, तंत्रज्ञांपासून ते अभियंत्यांपर्यंत रात्रंदिवस काम करत आहेत.(Latest Marathi News)

ओडिशाच्या भीषण अपघातानंतर तब्बल 51 तासांनी बालासोर येथील अपघातग्रस्त भागातून पहिली ट्रेन रवाना झाली. दरम्यान, कोरोमंडल एक्स्प्रेस शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास बालासोर येथील बहनगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ मुख्य मार्गाऐवजी लूप लाईनमध्ये गेल्यामुळे तिथे उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली.

त्यानंतर कोरोमंडलवर बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस जाऊन धडकली. या अपघातात 288 जणांचा मृत्यू झाला आहे. इतिहासातील सर्वात मोठ्या रेल्वे अपघातांपैकी एक अपघात असल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT