xi jinping and modi  
देश

China-India: अरुणाचलच्या 3 खेळाडूंना प्रवेश नाकारल्यानंतर भारताचे सडेतोड उत्तर; घेतला मोठा निर्णय

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- अरुणाचल प्रदेशच्या तीन वुशु खेळाडूंना एशियन गेम्ससाठी प्रवास करण्यास चीनने नकार दिला आहे. यावर भारताने सडेतोड उत्तर दिलं आहे. केंद्र सरकारने चीनच्या या निर्णयाची निंदा केली आहे. तसेच क्रिडा आणि युवा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आशियाई खेळासाठी चीनचा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. (Union sports minister Anurag Thakur cancels visit to China for the 19th Asian Games )

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, 'आम्हाला कळालं आहे की चीनने भारताच्या एका भागात राहणाऱ्या खेळाडूंना चीनमधील हांगझू येथे होणाऱ्या आशियाई खेळासाठी बंदी घातली आहे. भारतीयांसोबत केलेले हे भेदभाव युक्त वर्तन आम्हाला अमान्य आहे. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अभिन्न अंग आहे आणि तो कायम राहील.'

नयेमन वांगसू, ओनिलू तेगा आणि मेपुंग लामगू या तीन वुशु खेळाडूंना प्रवेश नाकारण्यात आला आहे. तिघांना हांगझहोऊ एशियन गेम्स आयोजक समितीने मान्यता दिली असूनही त्यांना ट्रॅवल डॉक्युमेंट मिळाले नसल्याची माहिती आहे. भारताचे काही अधिकारी याआधीच चीनकडे रवाना झाले आहेत. अनुराग ठाकूर हेही एशियन्स गेम्ससाठी चीनमध्ये जाणार होते. पण, त्यांनी निर्धारित दौरा रद्द केला आहे.

भारतीय वुशु संघाचे इतर सात खेळाडू आणि कर्मचारी काल रात्री हाँगकाँगला पोहोचले, त्यानंतर ते हांगझू येथे गेले आहेत. अरुणाचलच्या तीन खेळाडूंना प्रवेश नाकारल्यानंतर भारताने हा मुद्दा एशियन गेम्स आयोजन समिती आणि ओसीए (ऑलिंपिक काऊन्सिल ऑफ एशिया) यांच्याकडे उपस्थित केला आहे. वुशू स्पर्धेची सुरुवात २४ सप्टेंबरपासून होणार आहे.

दरम्यान, चीनने अनेकदा खोडसाळपणा केला आहे. मागे चीनने एक नकाशा जाहीर केला होता. त्यामध्ये भारताचे अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीनचा भाग आपला असल्याचं दाखवलं होतं. त्यावरुन भारताने कठोर शब्दांत ताशेरे ओढले होते. अरुणाचल प्रदेश आपला भाग असल्याचा चीनचा दावा आहे. भारताने तो वारंवार फेटाळून लावला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT