Alwar Unique Love Story esakal
देश

Unique Love Story : पती आणि पाच मुलांना सोडून महिलेनं थाटला विवाहित प्रियकरासोबत 'संसार'

प्रेयसी प्रियकरासह तिच्या घरी जाऊ लागली, तेव्हा मुलं खूप रडत होती.

सकाळ डिजिटल टीम

प्रेयसी प्रियकरासह तिच्या घरी जाऊ लागली, तेव्हा मुलं खूप रडत होती.

अलवर : राजस्थानमध्ये (Rajasthan) प्रेमविवाहाचं (Love Marriage) अनोखं प्रकरण समोर आलंय. इथं एका महिलेनं पती आणि पाच मुलांना सोडून प्रियकरासोबत संसार थाटलाय. या महिलेच्या प्रियकरालाही पाच मुलं आहेत. मात्र, या लग्नानंतर 10 मुलं आईच्या प्रेमापासून वंचित राहिली आहेत. महिलेनं आपल्या मुलांना बाल कल्याण समितीकडं सुपूर्द केलंय.

तसंच प्रियकरानं त्याची पहिली पत्नी आणि पाच मुलांना त्याच्या आजी-आजोबांकडं ठेवलं आहे. मुलानं उचललेल्या या टोकाच्या पावलामुळं हताश होऊन प्रियकराच्या वडिलांनी त्याला कुटुंबातून बेदखल केलं. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील (Alwar District) आहे. हरियाणातील तावडू येथील रहिवासी असलेल्या नूरजहाँचा विवाह अलवर जिल्ह्यातील जाजोर का बास येथील रहिवासी तैयब खान याच्यासोबत 2007 मध्ये झाला होता. लग्नाच्या 15 वर्षानंतर नूरजहाँनं आपल्या 5 मुलांना सोडून अलवरमधील तुलेदा गावात राहणारा तिचा प्रियकर मौसम खान (30) याच्याशी लग्न केलं. मौसम खान देखील विवाहित आहे. त्याला 5 मुलं आहेत.

दरम्यान, नूरजहाँ आपल्या मुलांना बाल संरक्षण आयोगाच्या सदस्यांकडं सोडून प्रियकरासह तिच्या घरी जाऊ लागली, तेव्हा मुलं खूप रडत होती. ती आईच्या मागं धावत होती. मात्र, त्या महिलेनं त्यांना कोणताही प्रतिसाद दिला नाही. पोलीस व बालकल्याण समितीचे सदस्यही हतबल झाले होते. मौसमनं प्रेयसीसोबत लग्न केल्यानंतर त्याच्या आई-वडिलांनी नातवंडं आणि सुनेला सोबत ठेवलं आहे. शिवाय, सदर पोलिस ठाण्यात तक्रार देऊन मौसमला कुटुंबातून बाहेर काढलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC Reservation: राज्य सरकारला मोठा झटका! ६७% ओबीसी आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर लागू झाल्यापासून केवळ २७ प्रमाणपत्रांचं वाटप; सरसकट आरक्षण नाहीच, दिशाभूल कोण करतंय?

Video: बाबो...! सोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट? पती झहीर इक्बालने पापाराझींसमोर तिच्या पोटावर हात ठेवला आणि...

Nashik Post : आनंदाची बातमी! टपाल विभागाकडून आता कॅनडा, अमेरिकेतही पोचणार दिवाळी फराळ!

Latest Marathi News Live Update : नाशिक- पुणे महामार्गावरा एसटी बसला अपघात, १० प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT