देश

ब्रिटनलाही सतावतोय प्लास्टिकचा भस्मासूर!

सकाळ वृत्तसेवा

लंडन : पर्यावरणासाठी घातक ठरणाऱ्या प्लास्टिकचा भस्मासूर ब्रिटनसाठीही डोकेदुखी ठरू लागला आहे. प्लास्टिकच्या कचऱ्यापासून समुद्र सुरक्षित ठेवण्यासाठी ब्रिटनमधील सुपरमार्केट्सनी प्लास्टिक बंदीचा विडा उचलला आहे.  जगभरात दरवर्षी 500 अब्ज प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जातो. दरवर्षी किमान 80 लाख टन प्लास्टिक समुद्रात जाते. जगभरातील एकूण कचऱ्यापैकी 10 टक्के कचरा प्लास्टिकचा असल्याचे एका अहवालातून उघड झाले आहे. त्यामुळे प्लास्टिकचा भस्मासूर संपवण्यासाठी अनेक देशांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

महाराष्ट्रात `सकाळ`ने प्लास्टिकविरोधी खास मोहिम राबवली होती. त्यानंतर सरकारने प्लास्टिकबंदीचा निर्णय घेतला. भारतासह जगभरातील अनेक शहरे प्लास्टिकच्या समस्यांनी हैराण झाले आहेत. त्यामुळे ब्रिटनने प्लास्टिकविरोधी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. तेथील सुपर मार्केट्सनी `न्यूड झोन` आणि `फूड इन दि न्यूड` मोहीम सुरू केली आहे. यापुढे सुपर मार्केट्समध्ये कोणत्याही पदार्थाकरिता प्लास्टिक आवरण न वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यापूर्वी दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या देशांनी असा निर्णय घेतला होता. सध्या ब्रिटेनमधील सुपर मार्केटमध्ये केळीही प्लास्टिकच्या आवरणात मिळतात. त्यामुळे दरवर्षी सुमारे आठ लाख 10 हजार टन प्लास्टिक कचऱ्यात जाते़. त्यामुळे पर्यावरणाची हानी होती. प्लास्टिकविरोधी मोहिमेमुळे ही समस्या दूर होईल, असा विश्वास तिथल्या व्यावसायिकांना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule: बॅंकांनी कर्जवसुलीसाठी तगादा लावू नये: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; शेतकऱ्याने जीवन संपवल्यास जबाबदार धरणार

Latest Marathi News Live Update : पुण्यात शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कुणाकडे? २४ नोव्हेंबरला होणार फैसला!

ढिंग टांग : गर्रर्र...गर्रर्र...गर्जना!

Maharashtra Drought: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळी मदतीला दोन हेक्टरची मर्यादा, तीन हेक्टरचे पंचनामे, राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

स्मार्ट सल्ला : इच्छापत्राची समंजस अंमलबजावणी

SCROLL FOR NEXT