Unmarried Couple Staying In A Hotel Room Not A Criminal Offence : Madras HC  
देश

'अविवाहित जोडप्याने हॉटेलमध्ये एकत्र राहणे गुन्हा नाही'

वृत्तसंस्था

चेन्नई : अविवाहित जोडप्याने हॉटेलमध्ये एकत्र राहणे गुन्हा नाही, असा निकाल मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे अविवाहित स्त्री-पुरुष युगुलाला रुम नाकारणाऱ्या हॉटेलांना दणका मिळाला आहे.

'विरुद्धलिंगी अविवाहित जोडप्यांना अतिथी म्हणून हॉटेलच्या रुमचा ताबा घेण्यास प्रतिबंध करणारा कोणताही कायदा किंवा नियम अस्तित्वात नाही. दोन सज्ञान व्यक्तींमधील लिव्ह इन रिलेशनशीप हे कायद्याच्या चौकटीत मोडत नाहीत. त्यामुळे अशा दोन सज्ञान अविवाहित जोडप्याने (महिला आणि पुरुष) हॉटेलमध्ये एकत्र राहणे गुन्हा ठरु शकत नाही,' असे मद्रास उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

तामिळनाडूतील कोइम्बतूरमध्ये याचिकाकर्ता एक सर्व्हिस अपार्टमेंट चालवत होता. पीलामेदू पोलिस स्टेशनच्या पथकाने 25 जून रोजी अपार्टमेंट परिसरात छापा टाकला. त्यावेळी एका खोलीत मद्याच्या काही बाटल्या आढळून आल्या. शिवाय, या खोलीत एक सज्ञान महिला आणि पुरुष आढळून आले. मात्र त्यांचा एकमेकांशी विवाह झालेला नव्हता. त्यानंतर संबंधित पथकाने कोणतीही नोटीस न देता परिसर सील केला. त्यामुळे याचिकाकर्त्याने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हायरल होत असलेल्या बातमीचा आधार याचिकाकर्त्याने घेतला.

बूकिंग रजिस्टरमध्ये खोलीत राहणाऱ्या स्त्री-पुरुषाचा कोणताही तपशील नव्हता. त्यामुळे या खोलीत अवैध व्यवहार चालत असावेत, असे पीलामेदू पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकांना तहसीलदारांनी सांगितल्याचे सरकारतर्फे म्हटले आहे.

अविवाहित जोडप्याला खोली देणे हे अनैतिक असल्याचे न्यायालयात सादर केलेल्या अहवालामध्ये म्हटले होते. परंतु, अविवाहित जोडप्याला खोली दिल्याने कायद्याचे उल्लंघन कसे होते, या न्यायालयाच्या प्रश्नाचे उत्तर सरकारी पक्षाला देता आले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM Balen Shah: नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह शंभर दिवसांमध्येच आले अडचणीत; सरकारविरोधात संघर्ष पेटला

IND vs ZIM 1st T20I: मयांक यादवने इतिहास रचला, पण कौतुक इशान किशनचे झाले! पहिल्याच चेंडूवर असे काय घडले? Video Viral

Ajit Pawar Statue: बारामतीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राज्यातील पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याचे भावपूर्ण लोकार्पण; तिरंगा सर्कलजवळ स्मृतीस्थळाला मान्यवरांची उपस्थिती

Latest Marathi Update : काँग्रेस कमिटी कार्यालयाबाहेर भाजपचं आंदोलन फसलं

Delhi Lathi Charge Protest: दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा मोहोळमध्ये तीव्र निषेध; विविध पक्ष, संघटना व वकील संघटनेची भव्य रॅली

SCROLL FOR NEXT