Yogi Adityanath Duplicate Death Sakal
देश

Yogi Adityanath: सीएम योगींसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू, अखिलेश यादव यांचा संताप, ट्विट करत म्हणाले,...

Yogi Adityanath Duplicate Death: सुरेश कुमार यांच्या पत्नीने उन्नाव पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

राहुल शेळके

Yogi Adityanath Duplicate Death: विधानसभा निवडणूक-2022 मध्ये समाजवादी पक्षाचे स्टार प्रचारक सुरेश कुमार योद्धा यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ट्विट करून हा दावा केला आहे. सुरेश हे उन्नाव जिल्ह्यातील रहिवासी होते. त्यांच्या निधनावर सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी ट्विट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अखिलेश यादव म्हणाले, “सपा प्रचारक म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सुरेश ठाकूर यांच्या लिंचिंगची घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. सरकारने लवकरात लवकर दोषींवर योग्य ती कारवाई करावी, असे आवाहन भावपूर्ण श्रद्धांजली.''

सुरेश कुमार योद्धा उन्नावच्या चौपई गावचे रहिवासी होते. त्यांच्या पत्नीने सांगितले की, गेल्या महिन्यात 28 जुलै रोजी सुरेश यांना त्यांच्या शेजारी राहणाऱ्या दोन भावांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत ते जखमी झाले.

त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून घरी सोडले. गेल्या गुरुवारी दुपारी त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना परत जिल्हा रुग्णालयात आणले असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

पोलीस ठाण्यात तक्रार केली, पोलिसांनी ऐकले नाही पत्नीचा आरोप

माहिती मिळताच पोलिसांनी सुरेश यांचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. सुरेश यांच्या मृत्यूची माहिती मिळताच सपाचे कार्यकर्ते आणि नेते मोठ्या संख्येने रुग्णालयात पोहोचले.

सुरेश कुमार यांच्या पत्नीने उन्नाव पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, मारहाणीनंतर त्यांनी सोहरामाळ पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार केली होती, मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. उलट पोलिस ठाण्यापासूनच त्यांचा पाठलाग करण्यात आला. पोलिस आरोपीशी संगनमत करत असल्याचे पत्नीने सांगितले.

उन्नाव पोलिसांनी स्पष्टीकरण

उन्नाव पोलिसांनी सुरेश कुमार यांच्या मृत्यूबाबत निर्माण झालेल्या गदारोळावर स्पष्टीकरण दिले. पोलिसांनी एक प्रेस नोट जारी केली होती, ज्यामध्ये असे लिहिले होते की, 10.08.2023 रोजी दुपारी 12 वाजता सुरेश यांची तब्येत अचानक बिघडली.

नातेवाइकांनी त्यांना उन्नाव जिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृताच्या शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा नाहीत.

सीओ हसनगंज संतोष कुमार सिंह यांनी सांगितले की, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. मारहाणीमुळे मृत्यू झाल्याची चर्चा चुकीची आहे. यात तथ्य नाही.

सुरेश कुमार योद्धा मुख्यमंत्री योगीं सारखे दिसत होते

सुरेश कुमार योद्धा हे समाजवादी पक्षाचे स्टार प्रचारक होते. निवडणूक प्रचारादरम्यान ते अनेकदा सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्यासोबत दिसले.

याचे मुख्य कारण म्हणजे त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारखे आपले रूप धारण केले होते. त्यांच्याप्रमाणेच भगवे कपडे घालणे, बोलीभाषा वापरणे इत्यादी गोष्टी सीएम योगी यांच्यासारख्याच होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Government Farmers Gift: मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; कॅबिनेटमध्ये घेण्यात आले तीन महत्त्वाचे निर्णय!

Gautami Naik Exclusive: गल्ली क्रिकेट ते स्मृती मानधनाची बॅटिंग पार्टनर! किरण मोरेंनी हेरलेल्या गौतमी नाईकचा कसा राहिला प्रवास

Sun Transit Cance: १६ जुलैपासून सूर्याचा कर्क राशीत प्रवेश! वृषभ, धनु आणि मीन राशींना मिळणार विशेष लाभ, जाणून घ्या तुमचं राशी भविष्य

Uddhav Thackeray-Eknath Shinde Video: ''ते आले, त्यांनी पाहिलं अन् मग त्यांनी...'' ; उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे आमने-सामने!

अमरीश पुरी नाही, 'हा' अभिनेता असता 'मिस्टर इंडिया'चा मोगॅम्बो; अचानक दाखवला बाहेरचा रस्ता, आजही होतोय पश्चाताप

SCROLL FOR NEXT