Narendra Modi Sakal
देश

'दांडी'बहाद्दर खासदारांबद्दल पंतप्रधानांची नाराजी

हजर राहण्यास का सांगावे लागते? अशा शब्दांत पंतप्रधानांनी तीव्र भावना व्यक्त केली

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : भाजपच्या (BJP) साप्ताहिक संसदीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी राज्यसभेत (rajysabha) सत्तारूढ खासदारांच्या अनुपस्थितीवर पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली. अधिवेशनात नियमितपणे हजर रहात जा, असे वारंवार सांगण्याची वेळ सन्माननीय सदस्यांवर का येते, अशा शब्दांत पंतप्रधानांनी तीव्र भावना व्यक्त केली. राज्यसभेतील एकूण २४५ सदस्यांपैकी एकट्या भाजपचे ९४ खासदार आहेत. (unpresent mps narendra modi disfavour)

भाजप आघाडी आणि भाजपला साथ देणाऱ्या पक्षांचे सदस्य मिळून ही संख्या १३० च्या पुढे जाते. या परिस्थितीत काल एका विधेयकावर विरोधकांकडून अनपेक्षितपणे मतविभाजनाची मागणी करण्यात आाली तेव्हा पीठासीन अधिकाऱ्यांनी, ‘सभागृहात गोंधळ सुरू असताना मतविभाजन शक्य नाही’, असे सांगून ती मागणी सुरवातीला फेटाळली. त्यावर विरोधी सदस्य तत्काळ आपापल्या जागेवर जाऊन बसले आणि सभागृहात शांतता निर्माण झाली. साहजिकच मतविभाजन घेणेही अपरिहार्य ठरले. त्यावेळी भाजप नेत्यांच्या चेहऱ्यावर धाकधूक स्पष्ट दिसत होती.

वरीष्ठ सभागृहात भाजपचे अजूनही स्पष्ट बहुमत नाही आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लोकसभेत गेल्यावर खासदारांची दांडी मारण्याची सवय उफाळून येत असल्याचे दिसते. कालच्या मतविभाजनात सत्तारूढ बाकांवरील मतांची संख्या केवळ ७९ इतकी होती. अर्थात विरोधी बाकांवरही फक्त ४४ सदस्य होते. मात्र पंतप्रधानांनी भाजप खासदारांच्या अनुपस्थितीबाबत रोष व्यक्त करताना दांडीबहाद्दर खासदारांची यादी तातडीने मागवून घेतली आहे. दरम्यान, बैठकीत ऑलिंपिक पदक विजेत्यांचेही अभिनंदन करण्यात आले.

बैठकीदरम्यान मोदींच्या सूचना

  • स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करावेत

  • तंदुरूस्त बेटा-बेटी स्पर्धा भरवाव्या

  • ‘आयुष्मान भारत गोल्डन कार्ड’ प्रत्येक भारतीयाकडे असावे यासाठी पुढाकार घ्यावा

  • शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीची माहिती द्यावी

  • जनआशीर्वाद यात्रा काढाव्यात

  • आपापल्या मतदारसंघांत, ग्रामीण भागांत खेळाबाबत जागृती वाढवावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलचे सलग दुसरे शतक! रोहित शर्माची त्याचदिशेने वाटचाल, पण, मोडला सचिनचा विक्रम, जगात दुसरा नंबर

Interest Rate: PPF-Sukanya योजनेत पैसे गुंतवलेत? बचत करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! PPFसह या योजनांचे व्याजदर कायम; पाहा कुठे मिळतं 8.2% व्याज

Pune Crime: बिग बॉस’फेम दिव्या शिंदेची पोलिस कोठडी वाढली; डॉ. गायकवाड हल्ला-खंडणी प्रकरणात १७ जणांचा सहभाग निष्पन्न

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्मा, शुभमन गिल यांचा १० षटकांतच वर्ल्ड रेकॉर्ड! जगात भारी टीम इंडियाचे कारभारी; विडींजला रडकुंडीला आणले

Kannad Sugarcane Fire: दुष्काळात कष्टाने जगविलेला ऊस विद्युत तारेने जाळला; कन्नडमध्ये शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT