Smartphone  sakal
देश

Smartphone : स्मार्टफोन जवळ घेऊन झोपणे असुरक्षित

चार्जिंग करताना उद्‍भवणाऱ्या धोक्याचा ‘ॲपल’कडून इशारा

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन : मोबाईल फोनजवळ झोपण्याचे संभाव्य धोके आणि तोट्यांकडे अनेक अभ्यासकांनी आधीच लक्ष वेधलेले आहे. ज्या लोकांना स्मार्टफोन जवळ घेऊन झोपण्याची सवय असलेल्यांसाठी आयफोनची निर्माती कंपनी ॲपलनेही एक सावधगिरीचा इशारा नुकताच दिला आहे. विशेष करून मोबाईल चार्ज होत असताना तो जवळ घेऊन झोपू नये, अशी सूचना ‘ॲपल’ने केली आहे.

मोबाईल फोन वापरकर्त्यांच्या आरोग्यावर आणि एकूणच मनस्वास्थासंबंधीचे संभाव्य नकारात्मक परिणाम अभ्यासकांनी सांगितले आहे. आता ‘ॲपल’नेही मोबाईलधारकांना याबाबत सूचना दिल्या आहेत.

अॅपलच्या ऑनलाइन माहिती पुस्तिकेत या इशाऱ्याचा समावेश केला आहे. हवेशीर वातावरणात आणि टेबलसारख्या सपाट पृष्ठभागावरच आयफोन चार्ज केले जावेत. ब्लँकेट, उशा किंवा शरीरासारख्या मऊ पृष्ठभागांवर चार्जिंग करू नये, अशी स्पष्ट सूचना त्यात नमूद केली आहे.

चार्जिंग सुरू असताना आयफोन गरम होतात. जेव्हा ही उष्णता मर्यादित जागेमुळे सहज बाहेर सोडता येत नाही, त्यावेळी भाजण्याचा किंवा अधिक गंभीर प्रकरणांमध्ये आग लागण्याचा धोका असतो. चार्जिंग होत असलेला स्मार्टफोन उशीखाली ठेवण्‍याची सवय अनेकजणांना असते, जे अत्यंत असुरक्षित मानले जाते, असे माहिती पुस्तिकेत म्हटले आहे.

ॲपल’ने थेट दिलेला प्राथमिक संदेश

  • मोबाईल फोन चार्जिंगला लावलेला असताना फोनवर किंवा पॉवर अॅडॉप्टर किंवा वायरलेस चार्जरवर झोपू नये

  • चार्जिंगचा फोन ब्लँकेट, उशी किंवा शरीराखाली ठेवणे टाळावे

  • आयफोन, पॉवर अॅडॉप्टर आणि कोणताही वायरलेस चार्जर वापरात असताना किंवा चार्ज होत असताना हवेशीर क्षेत्रात ठिकाणी ठेवावा

  • शारीरिक व्याधीमुळे एखाद्याला फोन गरम झाल्याचे जाणवत नसेल, अशा वेळी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्‍यक

  • चार्जिंगसाठा खराब झालेल्या वायरचा किंवा चार्जरचा वापर करू नये. आद्रता असताना चार्जिंग करू नये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT