harsimrat kaur 
देश

'तोपर्यंत भाजपशी युती नाही'; अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल यांचा निर्धार

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्यांच्या मुद्यावरून भाजपची साथ सोडणारा पंजाबमधील भाजपचा सर्वांत जुना मित्रपक्ष, शिरोमणी अकाली दलाने सरकारविरोधातील आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. भाजपने कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या नव्या पक्षाबरोबर आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याचे निश्चित करताच अकाली दलाने संसदेत आक्रमक भूमिका घेण्याचे जाहीर केले आहे.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याशिवाय आणि आंदोलनात जे ८०० शेतकरी हुतात्मा झाले आहेत त्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याचे मान्य केल्याशिवाय अकाली दल पुन्हा भाजपबरोबर युती करणार नाही असे पक्षाच्या नेत्या आणि मोदी सरकार मधील माजी मंत्री खासदार हरसिमरत कौर बादल यांनी आज सांगितले. कॅ. अमरिंदरसिंग यांच्याशी युती करून भाजपने भविष्यातील शक्यतेवर देखील पाणी फेरल्याचे अकाली दलाच्या एका नेत्याने सांगितले. कोणत्या पक्षाने कोणत्या पक्षाशी युती करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र भाजपने केलेल्या या नव्या युतीचा त्या पक्षाला पंजाबमध्ये काही फायदा होणार नाही व राज्यातील सत्तेसाठी खरी लढत अकाली दल व कॉंग्रेस यांच्यातच असेल. आम आदमी पक्ष मधल्या मध्ये किती जागांवर ‘मते खाऊ’ भूमिका बजावतो यावर सत्तेचे गणित अवलंबून असेल, असेही तो नेता म्हणाला.

याबाबत बोलताना अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी म्हटलंय की, अकाली दलासह सर्व विरोधी पक्षांचा विरोध डावलून जे कृषी कायदे मोदी सरकारने लोकसभा आणि राज्यसभेत बहुमताच्या जोरावर मंजूर केले, ते मुळात लोकशाहीविरोधी होते. त्यानंतर अकाली दलाने तत्काळ भाजपची साथ सोडून आपला पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याची भूमिका घेतली व आजही आम्ही त्याच भूमिकेवर कायम आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT