PMAY End 31 March 2022 e sakal
देश

PMAY Scheme: 'पंतप्रधान आवास'चे पैसे खात्यात येताच 11 महिला प्रियकरासोबत फरार; मोठा घोटाळा उघड

गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना कायम स्वरुपी घरासाठी या योजनेंतर्गत सबसिडी दिली जाते.

Amit Ujagare (अमित उजागरे)

लखनऊ : पंतप्रधान आवास योजनेचे अर्थात PMAY योजनेचे पेसै घेऊन ११ महिला आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळं एकच खळबळ उडाली आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना कायम स्वरुपी घरासाठी या योजनेंतर्गत सबसिडी दिली जाते. (UP 11 married women take money from Centre Awas Yojana run away with lovers Reports)

माध्यमातील वृत्तानुसार, उत्तर प्रदेशातील महाराजगंज येथील ११ महिलांनी केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेतला पहिला ४०,००० रुपयांचा हप्ता मिळवला. त्यानंतर त्यांनी आपल्या नवऱ्यांना सोडून त्या आपल्या प्रियकरांसोबत पळून गेल्या. पळून गेलेल्या महिलांच्या नवऱ्यांनी जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रारी दिल्या त्यानंतर ही गोष्ट उघड झाली.

महाराजगंज जिल्ह्यातील २,३५० लाभार्थ्यांना पीएमएवाय या योजनेंतर्गत पैसे मिळाले होते. यांपैकी थुथीबारी, शीतळापूर, चाटिया, रामनगर, बकुल दिहा, खासरा, किशुनपूर आणि मेधौली गावातील लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा मिळाला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर अधिकाऱ्यांनी या लाभाऱ्यांचा दुसरा हप्ता थांबवला आहे, असं काही माध्यमांनी आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

PMAY या योजनेंतर्गत गरीब आणि मध्यम वर्गीय कुटुंबियांना कायमस्वरुपी घरं बांधण्यासाठी सबसिडी दिली जाते. या योजनेतून सुमारे २.५ लाखांपर्यंत सबसिडी मिळते. कुटुंबाचं उत्पन्न किती आहे? त्यावर हे अवलंबून आहे. जर यामध्ये काही घोटाळा दिसून आला तर सरकार ही सबसिडी परत मागवू शकते.

असाच प्रकार वर्षभरापूर्वी उत्तर प्रदेशातच घडला होता यामध्ये पंतप्रधान आवास योजनेचे पैसे मिळाल्यानंतर चार विवाहित महिला आपल्या प्रियकरांसोबत घरुन पळून गेल्या. या महिलांच्या खात्यात पहिला ५०,००० हजार रुपयांचा हप्ता जमा झाला होता. पैसे जमा झाल्यानंतरही या महिलांच्या घरांचं बांधकाम सुरु झालं नसल्यानं अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघड झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

'प्रेमाची गोष्ट'च्या पाठोपाठ छोट्या पडद्यावरील आणखी एक मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केली भावुक पोस्ट

High BP Causes: 'या' 3 दैनंदिन सवयी बनतात उच्च रक्तदाबाचं मुख्य कारण! आजच बदल करा

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

SCROLL FOR NEXT