Road Accident  Sakal
देश

Accident : लखीमपूर खेरीत ट्रक-बसचा भीषण अपघात; आठ ठार, अनेक जखमी

सकाळ डिजिटल टीम

Road Accident In UP Lakhimpur Kheri : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आठ प्रवाशांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी असल्याचे सांगितले जात आहे. मृतांमध्ये महिलांची संख्या अधिक आहे. अपघातात जखमी झालेल्यांपैकी काहींची प्रकृति चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यातील पिलीभीत बस्ती महामार्गावरील शारदा पुलाजवळून बुधवारी सकाळी आठच्या सुमारास खासगी बस धौरहराहून लखीमपूरकडे निघाली होती. तर, ट्रक लखीमपूरहून बहराइचला जात होता. त्यावेळी अचानक ट्रक आणि बसची टक्कर झाली. ही टक्कर इतकी भीषण होती की, यामध्ये बसचा अक्षरक्षः चक्काचूर झाला. त्यात 8 जणांचा मृत्यू झाला तर, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत मदत आणि बचावकार्य सुरू केले. तसेच जखमींना जवळीन रूग्णालात दाख केले. अपघातातील जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. हा अपघात नेमका कसा झाला याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर CJP चा उत्तर प्रदेश सरकारविरोधात मोर्चा; दिला निर्वाणीचा इशारा

Commonwealth Games 2026 : पदकाच्या अपेक्षा घेऊन, तो ग्लास्गोत आला अन् पहिल्याच फेरीत बाद झाला; गुरिंदरवीर सिंगच्या Exit ने भारताला धक्का...

Patanjali News: बाबा रामदेवांच्या पतंजली फूड्सला मोठा धक्का! पीठात कीटकनाशकाचे प्रमाण जास्त; शेअर ₹552 वरून ₹344 वर

Crime: धक्कादायक! बाथरूमला जाऊ दिलं नाही म्हणून मुलाने पँन्टमध्ये लघवी केली; संतापात शिक्षिकेने विद्यार्थ्यांच्या गुप्तांगाला चटके दिले

अभिजीत दीपकेंच्या लग्नाची तयारी? आईने सांगितलं कशी हवी सून? म्हणाल्या, ''आमच्याकडे अनेक स्थळं आली पण...''

SCROLL FOR NEXT